Property Rights : आपल्याकडे मालमत्तेसंबंधी वादविवाद काही नवे नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून भांडणे होतात वाद-विवाद होतात आणि अशी प्रकरणे पुढे न्यायालयात पोहोचतात. खरं तर भारतात संपत्ती विषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत.
मात्र या कायद्यान मधील तरतुदी सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाहीत. हेच कारण आहे की संपत्ती विषयक कायद्यांबाबत सर्वसामान्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. दरम्यान आज आपण संपत्ती विषयक कायद्यातील एका महत्त्वाच्या बाबीची माहिती जाणून घेणार आहोत.

संपत्तीच्या कारणांवरून होणारे वाद केवळ मध्यमवर्गीय कुटुंबांमध्येच नाही तर संपन्न घराण्यांमध्येही होत असतात. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून लग्न झालेल्या बहिणीला आपल्या भावाच्या संपत्तीवर अधिकार सांगता येतो का,
लग्न झाल्यानंतर बहीण आपल्या भावाच्या संपत्तीवर दावा करू शकते का याबाबत भारतीय कायद्यात काय तरतूद करण्यात आली आहे याविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते. यामुळे आज आपण यासंदर्भात संपत्ती विषयक कायद्यांमध्ये काय तरतूद करून देण्यात आली आहे याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
कायदा काय सांगतो
भारतीय कायद्याने आई वडिलांच्या संपत्तीत मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेले आहेत. वडिलोपार्जित संपत्तीत मुलांना आणि मुलींना समान अधिकार देण्यात आलेले आहेत.
पण, आई-वडिलांची स्वतः कमावलेली मालमत्ता असेल म्हणजेच स्वअर्जित संपत्ती असेल तर पालकांना त्यांना त्यांची संपत्ती कोणालाही देण्याचा अधिकार आहे. म्हणजेच स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती पालक कोणालाही देऊ शकतात.
स्वतःच्या कष्टाने कमावलेली संपत्ती आपल्या विवाहित मुलीला सुद्धा देऊ शकतात आणि अशा परिस्थितीत मुलगा त्या वाटपावर आक्षेप नोंदवण्यास असमर्थ ठरतो. मात्र, वडिलोपार्जित मालमत्तेबाबत भारतीय सरकारकडून काही वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत.
हिंदू उत्तराधिकार कायदा, 2005 नुसार, वडिलांची मालमत्ता जर त्यांनी स्वतः कमावलेली नसेल तर ती वडिलोपार्जित समजली जाते आणि अशी वडिलोपार्जित मालमत्ता मुलांना आणि मुलींना सारख्या प्रमाणात दिली जाते. म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगा आणि मुलगी समान वाटेदार असतात. पण, भावाच्या संपत्तीत बहिणीला अधिकार मिळतो का?
भावाच्या संपत्तीत बहिणीला अधिकार मिळतो का?
जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार भावाच्या स्वतःच्या मिळकतीवर बहिणीला कोणताच अधिकार मिळत नाही. सामान्य परिस्थितीत बहिणीला भावाच्या संपत्तीमध्ये अधिकार नसतो मात्र काही विशिष्ट परिस्थितीत बहिणीला तिच्या भावाच्या संपत्तीत अधिकार मिळू शकतो.
तज्ञांनी अशी माहिती दिली आहे की जर भावाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्युपत्र म्हणजेच इच्छापत्र तयार केलेले नसेल आणि मयत भावाला पत्नी अथवा मुलगा किंवा मुलगी नसेल तर अशा परिस्थितीत बहिणीला त्याच्या संपत्तीत अधिकार मिळू शकतो.
अशावेळी बहिणीला Class II heirs म्हणजेच वर्ग दोनचे वारसदार म्हणून पाहिले जाते आणि अशा प्रकरणात बहिण आपल्या मयत भावाच्या मालमत्तेवर दावा करू शकते.