लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच दिवशी जमा होणार 3000 रुपये ! समोर आली मोठी अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला आणि आता लाडक्या बहिणी पुढील मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केली.

या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत आणि अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.

लाडक्या बहिणींना अकराव्या हप्त्यासोबत मिळणार तीन हजार रुपये

दोन आणि तीन मे 2025 रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला. या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिलच्या हफ्त्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले. दरम्यान आता मे महिना संपण्यास अवघ्या तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.

यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय. खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेच्या मे हप्त्याच्या फाईलवर मी स्वाक्षरी केली असल्याचे विधान केले होते.

यामुळे मे महिन्याचा हप्ता हा महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मे महिना संपण्याचा आता फक्त दोन-तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला यामुळे मे महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्यातच मिळणार अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाऊ शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

म्हणजेच पुढील महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे. तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही यामुळे सरकारकडून नेमका काय निर्णय होतो? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

कशी आहे लाडकी बहिण योजना ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरतात.

याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतो. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ दिला जातोय. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जात आहे.

ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मात्र याचा लाभ मिळत नाही. सरकारी नोकरदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही. ज्या महिलांना इतर आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळतोय त्यांनाही याचा लाभ दिला जात नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe