यंदा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार ! शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सुट्ट्याच वेळापत्रक समोर

राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी शैक्षणिक वर्षात राज्यातील विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार? याबाबतची माहिती राज्य बोर्डाकडून देण्यात आली आहे. 

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय शाळांसाठी सुधारित कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार? ही माहिती समोर आली आहे.

खरंतर, नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 हे 16 जानेवारी 2025 रोजी सुरु होणार आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार?

अजून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काही दिवसांचा कारभारी आहे मात्र त्याआधीच राज्य बोर्डाकडून नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ? याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचे सुधारित कॅलेंडर राज्य बोर्डाने नुकत्याच जाहीर केले आहे.

या कॅलेंडरनुसार नवीन वर्षात शाळांना एकूण 129 सुट्ट्या राहणार आहेत आणि 236 दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. खरेतर, राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरु होणार आहेत. मात्र विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागातील शाळा थोड्या उशिराने म्हणजेच 23 जून 2025 पासून सुरू होतील.

कारण म्हणजे जून महिन्यात विदर्भात नेहमीच मोठ्या प्रमाणात तापमान  असते, आणि याच वाढीव तापमानाच्या अनुषंगाने विदर्भातील शाळा उशिराने भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महत्त्वाची बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भातील शाळा सकाळ सत्रात भरवल्या जातील आणि नंतर काही दिवसांनी त्या नियोजित वेळापत्रकानुसार भरवल्या जाणार आहेत.

दरम्यान राज्य बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेले कॅलेंडर तयार करतांना शिक्षक संघटनांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती आणि सर्वपक्षीय सहमतीनंतरच अंतिम कॅलेंडर निश्चित करण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक वर्षात मिळणार अतिरिक्त सुट्ट्या 

शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये सुट्ट्यांची संख्या वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षात 53 रविवार येत आहेत. जे की सर्वच कार्यबाह्य दिवस म्हणून गणले गेले आहेत. त्याशिवाय या सुट्ट्यामध्ये इतर सार्वजनिक सुट्ट्या, सण आणि नियोजित विश्रांतीच्या दिवसांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

यानुसार, नव्या शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या 129 इतकी झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिल पासूनच सुरू करण्याचा विचार करण्यात आला होता.

शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी असेच संकेत दिले होते. मात्र राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी या विचारावर आक्षेप घेतला आणि यामुळेच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी यंदाही शाळा 16 जूनपासूनच सुरू होतील असे जाहीर करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe