DMart Shopping Tips : तुम्हीही डी मार्टला जाता का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर संपूर्ण भारतभर डी मार्ट च्या शाखा आहेत आणि डी मार्ट मध्ये जाऊन शॉपिंग करण्याला मध्यमवर्गीय पसंती दाखवतात. कारण म्हणजे डी मार्ट वरील आकर्षक ऑफर्स. डी मार्ट वर तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतात.
डी मार्ट मध्ये सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू, लहान मुलांसाठी कपडे, चप्पल, तसेच पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी सुद्धा कपडे उपलब्ध होतात. ग्रोसरी मध्ये पण सर्वच वस्तू उपलब्ध आहेत. म्हणजेच ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होतात.

आतापर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये डी मार्ट ची शाखा ओपन झालेली आहे. महत्वाची बाब म्हणजे अजूनही ज्या ठिकाणी डी मार्ट पोहोचलेले नाही तिथे ही शाखा ओपन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान जर तुम्हीही डी मार्ट ला जाऊन शॉपिंग करत असाल, महिन्याचा किराणा भरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे कारण की आज आपण डी मार्ट मध्ये कोणत्या तारखेला सगळ्यात स्वस्त सामान मिळतं याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डीमार्टवर मिळतो मोठा डिस्काउंट
DMart हे एक असे शॉपिंग मॉल आहे जिथे सर्वच वस्तू कमी किंमतीत खरेदी करता येतात. या ठिकाणी जीवन आवश्यक वस्तूंवर सुद्धा डिस्काउंट मिळतो. येथील डिस्काउंट ऑफर मुळे ग्राहक डी मार्टवर शॉपिंग करण्यास प्राधान्य दाखवतात.
डी मार्ट वर एमआरपी पेक्षा कमी किमतीत वस्तू मिळतात कधीकधी तर बाय वन गेट वन फ्री सारख्या ऑफर सुद्धा असतात. तर कधी कधी थेट अर्ध्या किमतीत वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळते.
दरम्यान महिन्याच्या कोणत्या तारखेला डी मार्ट वर स्वस्तात वस्तू खरेदी करता येतात? असा प्रश्न काही लोकांकडून उपस्थित होत होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की डी मार्ट मध्ये दररोज ऑफर असते.
डी मार्ट वर विकल्या जाणाऱ्या सामानावर डेली ऑफर सुरू असते आणि याचा ग्राहक फायदा घेतात. मात्र तरी काही विशिष्ट तारखांना डी मार्टमध्ये अधिकाधिक वस्तूंवर ऑफर लागलेली असते.
महिन्याच्या या तारखांना डी मार्ट भेट द्यावी
आम्ही आपणास सांगू इच्छितो की डी मार्ट च्या स्टोअरवर दररोज MRP पेक्षा कमी दरात वस्तू मिळतात. पण शनिवार तसेच रविवारी आणि मंडे क्लीन अप सेल मध्ये येथे जास्त वस्तूंवर ऑफर दिली जाते. कारण म्हणजे वीकेंडला सुट्टी असल्याने डी मार्ट मध्ये जास्त ग्राहक येतात आणि साहजिकच मग गर्दीच्या वेळी या ऑफर पाहून जास्त खरेदी होते.
हेच कारण आहे की शनिवारी आणि रविवारी डी मार्ट मध्ये जास्त वस्तूंवर तुम्हाला ऑफर पाहायला मिळते. यामुळे जर तुम्हीही DMart मध्ये शॉपिंगला जाणार असाल तर शनिवारी आणि रविवारी जा म्हणजेच तुम्हाला जास्त वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील.