लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी ! ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार 3000 रुपये, मे आणि जूनचा हफ्ता सोबतच येणार

लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात येईल या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली असून आज आपण याच बाबतची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे. जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरंतर मे महिन्याच्या दोन आणि तीन तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा म्हणजे दहावा हप्ता जमा करण्यात आला.

एप्रिलचा लाभ मे महिन्यात मिळाला यामुळे मे महिन्याचा लाभ हा कधी मिळणार असा सवालही उपस्थित झाला. दरम्यान सरकारकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती देण्यात आली.

स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मे महिन्याच्या शेवटी आपण लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली असल्याची माहिती दिली.

पण असे असतानाही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता मे महिन्यातच मिळू शकला नाही. पण आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा होणार आहेत.

या तारखेला मिळणार योजनेचा अकरावा हप्ता

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना यावेळी दोन हप्त्यांचे पैसे सोबतच दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना अकरावा आणि बारावा या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रित रित्या दिले जातील.

जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण येतोय आणि याच वटपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात मे आणि जून या दोन हप्त्यांचे पैसे वर्ग केले जाणार असल्याची बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

मात्र याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. दहावा हफ्ता जमा करताना सुद्धा असेच सांगितले जात होते, दहावा आणि अकरावा हप्ता सोबतच जमा होईल असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.

पण प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त दहावा हफ्ताचं जमा झाला. यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 11वा आणि बारावा हफ्ता सोबतच जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कशी आहे लाडकी बहिण योजना?

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लाभार्थी असणारी योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये वर्ग केले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार अशा महिलांना या योजनेतून लाभ मिळतो. वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतो आणि फक्त महाराष्ट्रातील महिलाच या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळत नाही. स्वतः महिला किंवा कुटुंबातील इतर सदस्य सरकारी नोकरदार असेल तर याचा लाभ मिळत नाही. आमदार, खासदार यांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही. आयकर भरणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतं नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News