Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जात आहे. ज्या भागात अजून पर्यंत रेल्वे पोहोचलेले नाही तिथेही रेल्वेचे रुळ टाकले जात आहेत.
याशिवाय रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी वेगवेगळ्या रेल्वे गाड्या देखील सुरू केल्या जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही देखील अशीच एक सेमी हायस्पीड ट्रेन आहे. खरेतर ही गाडी सुरुवातीला नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले. दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेसचा यशानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आनंदाची बाब अशी की देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मान आपल्या महाराष्ट्राला आणि उत्तर प्रदेश राज्याला मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच लखनऊ ते मुंबई दरम्यान सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते लखनऊ या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
उत्तर भारतातील प्रवाशांना या एक्सप्रेस ट्रेनमुळे जलद गतीने मुंबईत येता येणे शक्य होईल. दरम्यान आता याच देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
काय आहेत डिटेल्स ?
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या गाडीचा मार्ग निश्चित झाला आहे पण या गाडीचे वेळापत्रक अजून अंतिम झालेले नाही. मात्र जून महिन्यात या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान या महिन्यात जर या गाडीचे वेळापत्रक अंतिम झाले तर लवकरच ही गाडी रुळावर धावताना दिसणार आहे. ही देशातील पहिलीच वंदे भारत स्लीपर ट्रेन राहणार असल्याने या गाडीचा लोकार्पण सोहळा देखील मोठा थाटामाटात संपन्न होईल अशी आशा आहे.
कसा असणार नव्या गाडीचा मार्ग
देशातील पहिल्या वंदे भारत सेल्फरेटर येण्याच्या रूट बाबत बोलायचं झालं तर ही गाडी लखनऊहून हरदोई, शाहजहांपूर, बरेली जंक्शन, रामपूर, मुरादाबाद, गाझियाबाद, निजामुद्दीन व आग्रा मार्गे मुंबईला येणार आहे.
ही गाडी सुरू झाल्यानंतर लखनऊ ते मुंबई हा प्रवास फक्त दहा तासात पूर्ण होणार आहे. या प्रस्तावित वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये 20 कोच असतील, ज्यामध्ये एसी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि दोन SLR कोचचा समावेश राहणार असे बोलले जात आहे. या ट्रेनची एकूण प्रवासी क्षमता 1200 इतकी राहणार आहे.
ही ट्रेन आठवड्यात फक्त चार दिवस चालवली जाणार अशी योजना रेल्वे कडून तयार करण्यात आली आहे. या गाडीचे वेळापत्रक जून महिन्यात जाहीर केले जाईल आणि रेल्वे बोर्डाच्या अंतिम मंजुरीनंतर ट्रेनची चाचणी जुलै महिन्यात होईल अशी शक्यता आहे.