काही लोकांकडे एक असामान्य चमक असते, म्हणजेच त्यांच्या वागण्यात, बोलण्यात एक वेगळीच झलक असते. लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी असतं की, लोक त्यांना आपोआप जोडली जातात. त्यांचं बोलणं गोड, वागणं प्रेमळ आणि नातेसंबंध इतके खोल असतात की त्यांच्या भोवती लोक आपोआप खेचले जातात. ही जादू कुठून येते, असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेल. आज आपण अशाच एका विशेष अंकाबद्दल जाणून घेणार आहोत तो म्हणजे मूलांक 6. ज्यांचा जन्म महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो आणि त्यांचं जीवन खरंच काहीसं वेगळं असतं.

मूलांक 6 चा स्वभाव आणि गुण
मूलांक 6 हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो. शुक्र म्हणजे प्रेम, सौंदर्य, विलास आणि कलेचं प्रतीक. त्यामुळेच या संख्येच्या लोकांमध्ये एक प्रकारचं स्वाभाविक आकर्षण असतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतकी मोहकता असते की, लोक त्यांच्या आसपास राहायला, त्यांच्याशी संवाद साधायला सतत उत्सुक असतात. पण ही मोहकता फक्त चेहऱ्यावर किंवा कपड्यांमध्ये नसते तर, ती असते त्यांच्या अंतर्मनात, त्यांच्या वागणुकीत, त्यांच्या दिलदार स्वभावात.
या लोकांचं आयुष्यही विलक्षण असतं. एकदा का त्यांनी एखाद्याशी नातं जोडलं, की मग ते नात्याची जपणूक करण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जातात. मग ते नातं मैत्रीचं असो, प्रेमाचं असो किंवा घरचं. ते सर्वांमध्ये समरसून राहतात. त्यांच्या आयुष्यात एकदा प्रवेश केला की, ती व्यक्ती त्यांची खास बनते आणि ते तिच्या अडचणींमध्ये खंबीरपणे उभे राहतात. म्हणूनच त्यांच्यावर लोकांना आंधळा विश्वास वाटतो.
मूलांक 6असलेले लोक नेहमी विलासितेकडे आकर्षित होतात. त्यांना चांगलं खाणं, सुंदर कपडे, महागड्या वस्तू आणि आलिशान जीवनशैली यांची आवड असते. पण त्यातही एक सौंदर्यदृष्टी असते. केवळ पैसे उधळण्यापेक्षा त्या गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा भाग होतात.
प्रेम आणि करिअर
प्रेमाच्या बाबतीत हे लोक अतिशय भावनिक असतात. ते त्यांच्या जोडीदारावर प्रचंड प्रेम करतात. त्यांना नात्यात स्थिरता आणि पारदर्शकता हवी असते. अशा व्यक्तींना नातेसंबंध जपण्यासाठी सर्वस्व गमवायला देखील हरकत नसते. त्यांचे जोडीदार म्हणजे त्यांच्या आयुष्यातील प्रेरणा असते, आणि त्यांच्या प्रेमाला स्थायीत्व मिळालं की ते आयुष्यभर साथ देतात.
यश आणि संपत्ती या क्षेत्रातही मूलांक 6 चे लोक मागे नाहीत. शुक्राच्या प्रभावामुळे त्यांच्याकडे नैसर्गिक सौंदर्य, चांगला सेन्स आणि काम करण्याची जिद्द असते. त्यामुळेच ते व्यवसाय, कला, मिडिया किंवा सौंदर्याशी संबंधित क्षेत्रात यशस्वी होतात. त्यांच्या हातून लोकांशी चांगले संबंध तयार होतात, त्यामुळे ते एक प्रभावी नेटवर्क तयार करू शकतात आणि त्या नेटवर्कच्या बळावर अनेक संधी मिळवतात.
अर्थात, जिथे चांगल्या गोष्टी आहेत, तिथे थोड्या सावधगिरीच्याही गोष्टी असतात. मूलांक 6 असलेल्यांना आरोग्याच्या बाबतीत विशेषतः त्वचा, मूत्रपिंड यांच्याशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यांना तेलकट आणि गोड पदार्थांपासून थोडं अंतर ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैली आणि सकारात्मक विचार आवश्यक असतात.
जर तुम्ही मूलांक 6 चे असाल, तर शुक्राला बळकटी देण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता. जसं की शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करणं, “ओम शुं शुक्राय नम:” हा मंत्र 108 वेळा म्हणणं, शुभ मुहूर्तावर हिरा किंवा ओपल परिधान करणं (पण प्रथम ज्योतिषाचा सल्ला घ्या), आणि पांढऱ्या वस्तूंचं दान करणं. हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकतात.