बँक ऑफ बडोदाकडून 60 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार ?

तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी होम लोन घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे आणि या बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन पुरवले जाते. 

Published on -

Bank Of Baroda Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी गृह कर्ज घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर अलीकडे एसबीआय एचडीएफसी बँक ऑफ बडोदा यांसारख्या प्रमुख बँकांकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

महत्वाचे बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात सुद्धा करण्यात आली आहे. याचाही परिणाम होम लोन च्या व्याजदरावर पाहायला मिळतोय.

रेपो रेट कमी झाल्याने होम लोनचे इंटरेस्ट रेट सुद्धा कमी झाले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली होती.

याशिवाय या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.25% ची कपात केली. यामुळे देशातील जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या विविध प्रकारच्या कर्जाच्या व्याज दरात कपात करण्यास सुरुवात झाली आहे. बँक ऑफ बडोदा कडून देखील होम लोन च्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदा चा पर्याय बेस्ट राहणार आहे.  दरम्यान आता आपण बँक ऑफ बडोदा कडून 60 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याच संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत. 

बँक ऑफ बडोदाचे सध्याचे व्याजदर 

बँक ऑफ बडोदा सध्या आपल्या ग्राहकांना किमान 7.50% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र हा बँकेचा अगदीच सुरुवातीचा दर आहे या दरात फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच कर्ज मंजूर होऊ शकते.

तज्ञ सांगतात की ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना बँकेकडून किमान व्याजदरात कर्ज मंजूर होऊ शकते. त्यामुळे जर तुमचाही सिबिल स्कोर 800 च्या आसपास असेल तर तुम्हालाही बँक ऑफ बडोदा कडून 7.50% इंटरेस्ट रेट वर होम लोन मंजूर होऊ शकते. 

60 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ?

जर समजा बँक ऑफ बडोदा कडून तुम्हाला 7.50% इंटरेस्ट रेट वर 60 लाख रुपयांचे गृह कर्ज पंधरा वर्षांसाठी मंजूर झाले तर तुम्हाला 55 हजार 621 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच या कालावधीत तुम्हाला व्याज आणि मुद्दल असे एकूण एक कोटी 11,780 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच तुम्हाला 15 वर्षांच्या काळात 40 लाख 11 हजार 780 रुपये निवळ व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News