फक्त लाडकी बहिण योजनाच नाही तर ‘या’ 3 सरकारी योजना देखील महिलांसाठी आहेत उपयुक्त !

महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी असंख्य योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज आपण शासनाने सुरू केलेल्या अशाच तीन महत्त्वाच्या योजनांची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Government Scheme : महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. यामध्ये लाडकी बहिण योजनेचा देखील समावेश होतो. गेल्यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून दिला जात आहे.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळाले आहेत आणि येत्या काही दिवसांनी बारावा हफ्ता सुद्धा दिला जाणार आहे. पण लाडकी बहीण योजनेसोबतच महिलांसाठी इतरही अनेक योजना सुरू झालेल्या आहेत. दरम्यान आज आपण याच शेकडो योजनांपैकी तीन महत्त्वाच्या योजनांची माहिती पाहणार आहोत. 

सुकन्या समृद्धी योजना 

ही योजना मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी या योजनेची 2015 मध्ये सुरुवात झाली. मुलींच्या नावाने खाते ओपन करून तिच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी एक मोठा निधी या योजनेतून जमा करता येतो. या योजनेत किमान 250 रुपयांची गुंतवणूक करता येते.

या योजनेत जमा होणाऱ्या रकमेवर सरकारकडून चांगले व्याज दिले जाते. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने या योजनेत अकाउंट ओपन केले आणि दरमहा यामध्ये एक हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची मुलगी 21 वर्षांनी झाल्यानंतर तिला पाच लाख 54 हजार 612 रुपये मिळणार आहेत. 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 

ही देशभरातील महिलांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना 2017 मध्ये सुरू झाली आहे आणि या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना दिला जातो. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेतून मिळणारी मदत ही एक रकमीं मिळत नाही तर टप्प्याटप्प्याने दिली जाते. गर्भधारणे दरम्यान मातेची काळजी घेण्यासाठी आणि बाळंतपणानंतर बालकाची काळजी घेण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.

पीएम उज्वला योजना 

ही देखील केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांकडे अजूनही गॅस नाही त्यांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे गॅस सिलेंडर पुन्हा रिफील करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान सुद्धा दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या स्थितीला देशभरातील करोडो महिलांना लाभ दिला जातोय. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News