फडणवीस सरकारच लाडक्या बहिणींना मोठ गिफ्ट ! जून महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर ? कधी जमा होणार 1500 ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून याचा जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत एक नवीन माहिती हाती आली आहे. 

Published on -

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो ? या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय. 

या तारखेला जमा होऊ शकतो बारावा हफ्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झाली. या योजनेची घोषणा अजून 2024 मध्ये करण्यात आली आणि याचा लाभ जुलै 2024 पासून मिळतोय.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आला आहे.

महत्वाची बाब अशी की या योजनेचा जून महिन्याचा लाभ म्हणजेच या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 15 ते 20 जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होऊ शकतो.

तथापि या संदर्भात अजून सरकारकडून कोणतेच अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या दरम्यान या योजनेचा पैसा मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

मे आणि जून महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार होता

खरे तर, मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात सोबत जमा होणार अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे.

यामुळे आता जून महिन्याचा हप्ता अर्थातच बारावा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!