SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात, उद्यापासून लागू होणार नवीन रेट

एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील मोठी सरकारी बँक आणि याच बँकेने आता आपल्या ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. या बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली असून हे नवे रेट उद्यापासून लागू होणार आहेत.

Published on -

SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देत आहे. दरम्यान एसबीआय ने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

एसबीआयने होम लोनच्या व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या आठवड्यात आरबीआयने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिला.

आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

दरम्यान आरबीआयच्या निर्णयानंतर देशभरातील विविध बँका आपल्या कर्जांच्या व्याजदरात कपात करत आहेत आणि याच निर्णयानंतर एसबीआय ने देखील होम लोनच्या व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

SBI ने व्याजदरात किती कपात केली?

आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयानंतर स्टेट बँकेनेही लेंडिंग रेट्समध्ये 50 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.

दरम्यान एसबीआयच्या या निर्णयानंतर बँकेचे होम लोन आणखी स्वस्त होणार आहे आणि यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाच्या नवीन व्याजदरांची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकाचा CIBIL स्कोअर, कर्जाची मुदत आणि इतर घटकांच्या आधारे आता एसबीआयकडून होम लोनसाठी 7.50% ते 8.45% दरम्यान व्याज आकारले जाईल. तसेच SBI चे Maxgain OD कर्जासाठीचे व्याजदर 7.75% ते 8.70% इतके राहणार आहे.

तर टॉप-अप होम लोनसाठी दर 8% ते 10.50% दरम्यान असतील. होम लोन SBI च्या External Benchmark Lending Rate (EBLR) ला जोडलेले असून सध्याचा ईबीएलआर 8.15% आहे. याआधी तो 8.65% होता.

म्हणजेच एसबीआयच्या EBLR रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. मात्र, SBI ने MCLR दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज 14 जून 2025 पर्यंत एक वर्षाची MCLR 9.00%, तर तीन वर्षांचा दर 9.10% इतकां कायम राहणार आहे.

नवीन रेट कधीपासून लागू होणार 

एसबीआयने केलेला हा बदल लवकरच लागू केला जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे नवीन व्याजदर उद्यापासून अर्थातच 15 जून 2025 पासून लागू होतील अशी माहिती एसबीआय च्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. यामुळे आता ग्राहकांनी कर्ज घेताना हे बदल विचारात घ्यावेत असे आवाहन जाणकारांकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!