‘ह्या’ वनस्पतीला म्हणतात विषारी सापांचा अड्डा ! तुमच्याही घराजवळ असेल तर आताच उपटून फेका

साप दिसला की आपल्या अंगाचा थरकाप उडतो, साप डोळ्यासमोर दिसला तरी अंगावर काटे उभे राहतात आणि याचे कारण म्हणजे सर्पदंशामुळे आपल्याकडे मरण पावणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. खरंतर साप काही वनस्पतींकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात आणि आज आपण अशाच दोन वनस्पतींची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते ना मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, सापांची भीती वाटणे हे स्वाभाविक आहे. भारतात सापांच्या असंख्य प्रजाती आढळतात आणि त्यातील बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी आहेत.

भारतात विषारी प्रजातींची संख्या ही बोटावर मोजण्या इतकीच आहे मात्र असे असतानाही देशात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. एका अनाधिकृत आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक दरवर्षी सर्पदंशाने मरण पावतात.

त्यामुळे साहजिकच सापांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. खरे तर साप निसर्गात आढळणाऱ्या काही वनस्पतींपासून लांब पळतात आणि काही अशा वनस्पती आहेत ज्या की सापांना आपल्याकडे आकर्षित करत असतात.

दरम्यान आज आपण अशा दोन वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याकडे साप आवर्जून आकर्षित होतात आणि या वनस्पतीच्या आसपास हमखास साप दिसून येत असतो.  

या वनस्पतीकडे साप आकर्षित होतात 

अलीकडे शेतकऱ्यांना बांबूच्या शेतीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. खरंतर बांबूचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात होऊ लागला आहे. अलीकडे बांबूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने बांबूची शेती शेतकऱ्यांना परवडत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करणे हेतू शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा दिले जात आहे.

पण, बांबू ही एक अशी वनस्पती आहे जी की थंड सावली देते आणि बांबूजवळ गडद पालापाचोळा आणि दमट वातावरण असते. दरम्यान ही जागा सापांना लपण्यासाठी योग्य ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात बांबूच्या जाळीत साप सहजच आढळतात.

यामुळे ज्या ठिकाणी बांबू असेल त्या ठिकाणी थोडी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. तसेच घराजवळ बांबूचे झाड लावू नये असे सुद्धा म्हटले जाते. मात्र जर तुम्ही बांबूची शेती करत असाल तर बांबूच्या वावरात जाताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

चंदनाचे झाडही असते सापांचा अड्डा 

फक्त बांबूच नाही तर औषधी वनस्पती चंदन सुद्धा सापांचा अड्डा आहे. चंदनच्या झाडाची दाट पाने आणि फळांमुळे पक्षी चंदनाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात घरटी बांधतात. याशिवाय चंदनाचे झाड फारच शितल असते. यामुळे या ठिकाणी सापांचा वावर पाहायला मिळते.

चंदनाच्या झाडांवर आढळणारी पक्ष्यांची अंडी किंवा पिल्ले खाण्यासाठी साप चंदनाच्या झाडांवर चढतात. त्यामुळे अशा झाडांजवळ वावरतांना काळजीपूर्वक निरीक्षण आवश्यक आहे. हेच कारण आहे की अनेक जण घराजवळ चंदनाचे झाड लावू नये असा सल्ला देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!