अंकशास्त्रात प्रत्येक संख्येचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व असतं, एक अनोखी ऊर्जा असते. यातही ‘2’ क्रमांक असलेल्या मुलींची गोष्ट काही वेगळीच आहे. त्या कुठल्याही गर्दीत सहज ओळखू येतात, त्यांच्या सौंदर्यामुळे, त्यांच्या शांततेमुळे आणि त्यांच्या राणीसारख्या जीवनशैलीमुळे. पण अशा मुलींच्या मनात एक नाजूक, पण अतिशय ठाम व्यक्तिमत्त्व दडलेलं असतं.

ज्यांचा जन्म महिन्याच्या 2,11,20 किंवा 29 तारखेला होतो, त्यांचा अंकशास्त्रीय क्रमांक 2असतो आणि त्यांच्या जीवनावर चंद्राचा प्रभाव असतो. चंद्र म्हणजे सौंदर्य, भावनिकता आणि कोमलता या सगळ्यांचा सुरेख संगम या मुलींमध्ये दिसतो. त्या फारशा गोंधळ न माजवता, आपल्या स्वतःच्या विश्वात रमलेल्या असतात. त्यांना सुंदर कपडे, ब्रँडेड वस्तू, आरामदायक जीवनशैली आणि ऐश्वर्य यांची आवड असते. मात्र, त्याचबरोबर त्या आर्थिकदृष्ट्याही खूप शहाण्या असतात. खर्च करताना हात न उघडता बचतीचा विचार करतात. मालमत्ता, दागिने किंवा गुंतवणूक यामध्ये त्यांना चांगली समज असते.
मूलांक 2 चा स्वभाव
या मुली हुशार असतात, आणि त्यांचे विचार खूप खोल असतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्जनशीलतेने भारलेलं असतं, म्हणूनच त्या अनेकदा मीडिया, कला, अध्यापन किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये यश मिळवतात. त्या केवळ मेहनतीच नसतात, तर त्यांच्या नशिबाची साथही त्यांना योग्य वेळी मिळते. म्हणूनच त्या आयुष्यात खूप पुढे जातात. पैसा, प्रसिद्धी आणि समाधान यांचं उत्तम मिश्रण त्यांच्या हातात येतं.
मात्र, त्यांच्या सौंदर्याच्या आणि गोड बोलण्याच्या आड, एक भावनिक मन दडलेलं असतं. त्या खूप प्रेमळ असतात, आणि जोडीदारासाठी पूर्णपणे समर्पित असतात. त्यांचं प्रेम खरं आणि निःस्वार्थ असतं, पण कधी कधी हाच विश्वास त्यांना फसवतो. प्रेमात जरी त्यांना फटका बसला, तरी त्या लवकरच सावरतात आणि पुन्हा ताकदीनं उभ्या राहतात. त्यांचं जीवनसाथी म्हणून योगदान इतकं परिपूर्ण असतं की त्यांच्या उपस्थितीत घरात कायम शांतता आणि समाधान नांदते.
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, या मुली बाहेरून जरी शांत भासत असल्या, तरी त्यांचा मूड लवकर बदलू शकतो. त्या मूडी असतात, आणि जर कोणी त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर त्या खूपच तीव्र प्रतिक्रिया देऊ शकतात. चंद्राचा प्रभाव त्यांना भावनिकदृष्ट्या संवेदनशील बनवतो, म्हणूनच त्यांना मानसिक तणाव होण्याची शक्यता असते.
विशेष उपाय
अशा वेळी काही उपाय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणं, “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप करणं, चांदीच्या अंगठीचा वापर, योग आणि ध्यान यामुळे त्यांना मानसिक स्थैर्य मिळू शकतं.