नोटांवर हिंदू देवतेचे चित्र छापलेला एकमेव मुस्लिम देश, जिथे केली जाते गणपती बाप्पाची पूजा! तुम्हाला माहितेय का?

Published on -

इंडोनेशिया नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक मुस्लिम देश उभा राहतो. अशा ठिकाणी हिंदू संस्कृतीचं स्थान असेल असं वाटतं का? पण आश्चर्य म्हणजे, जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात, एक काळ असा होता जेव्हा त्याच्या नोटांवर भगवान गणेशाचं चित्र छापलं जात होतं. हे वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट सत्य आहे आणि त्यामागे एक समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.

इंडोनेशिया

इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे, जिथे सुमारे 24 कोटी लोकसंख्येपैकी 88 टक्के लोक मुस्लिम धर्माचे पालन करतात. मात्र, या धर्मसांस्कृतिक पार्श्वभूमीच्या पलीकडे पाहिलं तर इंडोनेशिया हा देश आपल्या हिंदू मूळांबद्दलही तितकाच आदर ठेवतो. तिथे केवळ मंदिरं किंवा मूर्तीच नाहीत, तर सरकारी चलनावरसुद्धा हिंदू देवतांचं अस्तित्व मान्य करण्यात आलं आहे.

1988 साली इंडोनेशियाच्या 20,000 च्या नोटेवर भगवान गणेशाचं चित्र छापण्यात आलं होतं. या विशेष आवृत्तीचं कारण केवळ धार्मिक नव्हतं, तर सांस्कृतिक आणि शैक्षणिकही होतं. इंडोनेशियामध्ये गणेशाला विद्येचा, कलांचा आणि बुद्धीचा देव मानलं जातं. त्यामुळे देशातील अनेक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आजही गणेशजींचं चित्र किंवा मूर्ती एका प्रतीकात्मक श्रद्धेने वापरली जाते. विशेषतः बांडुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या लोगोमध्येही गणेशाची प्रतिमा आढळते.

 

इंडोनेशियातील हिंदू संस्कृती

या देशाचा सांस्कृतिक इतिहास बघितला तर, सातव्या ते 16व्या शतकांदरम्यान येथे हिंदू आणि बौद्ध राजवटी होत्या. मजपाहित आणि श्री विजय साम्राज्य हे त्याकाळचे महत्त्वाचे हिंदू-बौद्ध सत्ताकेंद्र होते. बाली बेटावर तर आजही जवळपास 90 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. तसेच जावा बेटावर 1960 आणि 1970 च्या दशकात अनेकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. त्यामुळे इंडोनेशियातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव फक्त भूतकाळापुरता मर्यादित नाही, तर तो आजही अनेक स्तरांवर दिसून येतो.

गरुड हा भारतात जितका पवित्र मानला जातो, तितकाच इंडोनेशियामध्येही गौरवाचा विषय आहे. गरुड हे केवळ हिंदू धर्मातील वाहन नाही, तर इंडोनेशियाचं अधिकृत राष्ट्रीय प्रतीकसुद्धा आहे. 1992 साली त्यांच्या चलनावर ‘गरुड पंचशील’ नावाचं चित्र छापण्यात आलं आणि ते अजूनही तेवढ्याच आदराने वापरलं जात आहे. हे प्रतीक पाच मूलभूत तत्वांचं प्रतिक आहे, जे त्यांच्या संविधानाचा पाया मानले जातात.

“गरुड एअरलाइन्स”

इतकंच नव्हे तर इंडोनेशियाच्या विमान कंपनीचं नावसुद्धा “गरुड एअरलाइन्स” आहे, आणि त्याच्या लोगोमध्ये गरुड पक्ष्याचं सुंदर चित्र वापरण्यात आलं आहे. हे सर्व पाहता स्पष्ट होतं की, इंडोनेशिया हा केवळ इस्लामी राष्ट्र म्हणून मर्यादित न राहता, तो आपल्या प्राचीन परंपरांचा सन्मान करणारा देश आहे.

आज जरी भगवान गणेशाच्या नोटा चलनात नसल्या, तरी त्या इतिहासातल्या एक विलक्षण आणि अभिमानास्पद आठवणीसारख्या राहिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!