शरीरातील कोलेजन वाढवण्यासाठी डॉक्टरही सुचवतात ‘ही’ नैसर्गिक पेये! फ्री-रॅडिकल्स दूर होऊन त्वचा होईल आरशासारखी चमकदार

Published on -

वय जसजसं वाढतं, तसतसं आपल्या त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्वचा सैलसर होते, चमक कमी होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. आपल्या शरीरात एक महत्त्वाचं प्रोटीन असतं कोलेजन, जे त्वचेला घट्ट, तरुण आणि तजेलदार ठेवण्याचं काम करतं. याच कोलेजनच्या पातळीत सुधारणा केली, तर वयाच्या कित्येक पायऱ्या मागे नेणं शक्य आहे. त्यासाठी कोणताही खर्चिक उपचार किंवा कॉस्मेटिक उपाय आवश्यक नाही.काही साधे, नैसर्गिक पेये तुमच्या शरीरातील कोलेजनची पातळी वाढवू शकतात.

हळदीचं दूध

सर्वप्रथम बोलायचं झालं, तर हळदीचं दूध. रात्री झोपण्याआधी घेतलेलं गरम हळदीचं दूध केवळ सर्दी-पडसे नाही घालवत, तर त्यात असलेल्या कर्क्यूमिन नावाच्या घटकामुळे त्वचेत कोलेजनचं प्रमाण वाढतं. थोडक्यात, हळद आणि दूध हे एकत्र आल्यावर सौंदर्यवर्धक पेय बनतं, जे शरीरालाही उबदार ठेवतं.

ग्रीन टी

दुसरं म्हणजे ग्रीन टी. अनेकांना वजन घटवण्यासाठी ग्रीन टी प्यायची सवय असते, पण तिचं सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्व फार मोठं आहे. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि आतून निरोगी बनवतात. नियमित ग्रीन टी घेतल्यास त्वचेला नवा उजाळा मिळतो.

ताज्या भाज्यांचे रस

तिसऱ्या क्रमांकावर येतात ताज्या भाज्यांचे रस. गाजर, बीट, टोमॅटो आणि काकडी यांचा एकत्रित रस त्वचेसाठी खूप लाभदायक ठरतो. हे रस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात, त्यामुळे त्वचा आतून स्वच्छ आणि तजेलदार बनते. या रसात नैसर्गिक रंगद्रव्ये आणि जीवनसत्त्वे असतात, जे कोलेजनच्या निर्मितीला चालना देतात.

नारळ पाणी

नारळ पाणी ही आणखी एक वरदानासारखी गोष्ट आहे. उन्हाळ्याच्या दिवसात याने तहान भागतेच, पण ते त्वचेलाही आतून हायड्रेट करतं. यामधील आवश्यक खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स त्वचेला ओलावा देतात आणि कोलेजनची नैसर्गिक पातळी टिकवून ठेवतात. नारळ पाण्याच्या दररोजच्या सेवनानं त्वचा नितळ आणि कोवळी राहते.

लिंबूवर्गीय फळांचे रस

शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं लिंबूवर्गीय फळांचे रस. संत्री, मोसंबी, लिंबू यांसारख्या फळांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं, जे कोलेजन वाढवण्यासाठी मदत करते. हे रस त्वचेला नैसर्गिकरित्या तेजस्वी करतात आणि सुरकुत्यांना दूर ठेवतात. सकाळची सुरुवात जर लिंबूपाण्याने झाली, तर ती फक्त पचनासाठी नव्हे, तर सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!