सापांची भिती वाटते का ? मग ‘ह्या’ वनस्पतीच्या बिया घरात ठेवा, साप चुकूनही आजूबाजूला फिरकणार नाहीत

तुम्हालाही सापांची भीती वाटते का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण अशा एका वनस्पतीच्या बियांची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या तीव्र वासामुळे साप या बियांच्या आसपास सुद्धा फिरकत नाहीत.

Published on -

Snake Viral News : सध्या पावसाळा सुरू आहे, अनेक ठिकाणी पावसाचा जोर सुद्धा वाढत आहे.  पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे जवळपास 90 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत असतो.

यामुळे आपण सर्वजण सापांना घाबरतो. खरंतर भारतात सापांच्या विविध प्रजाती आढळतात. देशात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत आणि या प्रजाती विषारी, बिनविषारी तसेच निमविषारी आहेत. पण सापांच्या बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहेत.

असे असतानाही देशात दरवर्षी हजारो लोकांचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो. पण, साप सुद्धा काही वनस्पतींना आणि प्राण्यांना घाबरतात. एवढेच नाही तर साप काही वनस्पतींच्या बियांना सुद्धा घाबरत असतात आणि आज आपण याच बियांची माहिती पाहणार आहोत.

या बिया आहेत सापांच्या शत्रू

जाणकार लोक सांगतात की सर्पगंधा या वनस्पतीच्या बिया सापांच्या शत्रू म्हणून काम करतात. असे सांगतात की, सर्पगंधाच्या बियांमधून एक तीव्र वास येतो ज्यामुळे साप या बियांपासून लांब पळतात.

यामुळे जर तुमच्या हे घराच्या आजूबाजूला सापांचे प्रमाण अधिक असेल तर तुम्ही तुमच्या घरात तसेच घराच्या शेजारी या बिया ठेवू शकतात किंवा सर्पगंधा वनस्पतीची लागवड करू शकतात. सर्पगंधा वनस्पतीपासून साप नेहमीच लांब राहतात.

जाणकार लोक असे सांगतात की, सर्पगंधाच्या बिया केवळ सापांनाचं दूर ठेवतात असे नाही तर या बियांमुळे किडे सुद्धा लांब राहतात. या बिया डासांना सुद्धा पळवतात. सर्पगंधा वनस्पतींच्या बियांचा वास कोणत्याही कीटकांना आवडत नाही.

वास्तविक, सर्पगंधा बियाण्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. या बियाण्यात विशेषत: क्षराभ, रिसार्पिन, सर्पेन्टिन, एजमेलेसिन असे काही महत्त्वाचे घटक आढळतात.

हे घटक उच्च रक्तदाब रोखण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. एकंदरीत जर तुम्हाला सापांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरात सर्पगंधाच्या बिया ठेवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!