सापांची भीती वाटते ? मग घराशेजारी ‘या’ पाच झाडांची लागवड करा, साप चुकूनही घरात घुसणार नाही

तुम्हालाही सापांची भीती वाटते का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण सापांना अजिबात आवडत नाहीत अशा पाच वनस्पतींची माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुमच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला साप घुसण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही या वनस्पतींची घराशेजारी लागवड करू शकता.

Published on -

Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे आणि या सीजनमध्ये बिळात पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात. परिणामी, पावसाळ्याच्या सीजनमध्ये सर्पदंशाच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढतात. एका अनाधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी भारतात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो.

खरंतर भारतात सापांच्या फारच मोजक्या जाती विषारी आहेत, तरीही साप चावण्यामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. यामुळे आपण सर्वजण सापांना प्रचंड घाबरतो.

दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. कारण की आज आपण अशा पाच वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत ज्या घरा शेजारी लावल्यास घरात साप घुसणारच नाहीत. 

या वनस्पतींची लागवड केल्यास सापांचे टेन्शन मिटणार

स्नेक प्लांट : तुम्हालाही सापांची प्रचंड भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ, अंगणात, परसबागेत किंवा गच्चीवर स्नेक प्लांट हे रोपटं लावायला हवं. याला “मदर-इन-लॉज टंग” नावानेही ओळखलं जातं.

याची टोकेरी व लांब पाने सापांना नकोशी वाटतात. हे रोपटं घरात शोभेचंही काम करतं. यामुळे तुम्ही तुमच्या घरात डेकोरेशन साठी देखील हे इंडोर प्लांट लावू शकता. 

निवडुंग : ही एक काटेरी वनस्पती असल्याने साप त्यापासून दूर राहतात. ही वनस्पती मेडिसिनल पर्पज म्हणूनही लावली जाऊ शकते. या वनस्पती पासून साप नेहमी लांब राहतात. जंगली निवडुंग कुंपण म्हणून लावल्यास साप घरात प्रवेश करत नाहीत. 

झेंडू : झेंडूचे फुल तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात, परसबागेत गच्चीवर या फुलांची रोपटे लावायला हवीत कारण की हे फुलं केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर तीव्र सुगंधामुळे सापांनाही नकोशी वाटतात.

त्यामुळे घर व बाग सापांपासून सुरक्षित राहते शिवाय अंगणात घरात चांगला सुगंधही राहतो. तसेच यापासून मिळणारी फुले मंदिरात पूजेसाठी वापरली जाऊ शकतात.

नागदौना : या वनस्पतीची लागवड केल्यास सापांचे टेन्शन राहणार नाही. खरंतर या वनस्पतीला नागदमनी किंवा विषमार म्हणतात. या वनस्पतीचा गंध सापांना अजिबात आवडत नाही. यामुळे याची लागवड केल्यास नक्कीच चांगला फायदा होणार आहे.

सर्पगंधा : सापांची जर भीती वाटत असेल तर सर्पगंधा वनस्पतीची तुम्ही लागवड करू शकता. ही एक औषधी वनस्पती आहे शिवाय या वनस्पतीपासून एक तीव्र गंध येतो.  ही तीव्र गंध असलेली वनस्पती सापांना दूर ठेवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!