पहिल्यांदा विमानप्रवास करताय? मग ‘या’ 7 चुका टाळाच; अन्यथा होऊ शकते कायदेशीर कारवाई!

Published on -

विमान प्रवास हा अनेकांसाठी उत्साह, अनुभव आणि आरामाचा एक भाग असतो. पण कधी कधी अगदी छोट्या चुका किंवा गाफीलपणा तुमच्या प्रवासाचा आनंद हिरावून घेतो. विशेषतः जेव्हा आपण पहिल्यांदाच विमानात चढतो, तेव्हा अनभिज्ञतेमुळे काही गोष्टी अंगवळणी पडत नाहीत आणि परिणामी संपूर्ण प्रवास त्रासदायक ठरतो. त्यामुळे विमानप्रवास करताना काही गोष्टी विशेषतः टाळल्या पाहिजेत, जेणेकरून स्वतःबरोबरच इतर प्रवाशांचा अनुभवही सुखद राहील.

वागणुकीबाबत जागरूक

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वागणुकीबाबत जागरूक असणे. अनेक पालक आपल्या लहान मुलांना विमानात मोकळे सोडतात.ते इकडे-तिकडे धावतात, मोठ्याने बोलतात किंवा रडतात. जरी ही वागणूक लहान मुलांची नैसर्गिक प्रतिक्रिया असली तरी, ती इतरांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे प्रवासापूर्वीच मुलांना समजावून सांगणे आणि त्यांच्यासाठी खेळ, पुस्तकं किंवा इयरफोनसारखी शांतता राखणारी साधने ठेवणे फायद्याचे ठरते.

शूज आणि मोजे काढणे टाळा

तसेच, अनेक प्रवासी आराम मिळवण्यासाठी शूज आणि मोजे काढतात. पण लांबचा प्रवास असताना ही सवय केवळ गैरसोयीचीच नाही, तर आजूबाजूच्या लोकांसाठी त्रासदायक वासाचीही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे शक्यतो चप्पल घालणे किंवा मोजे स्वच्छ असावेत याकडे लक्ष द्या.

मद्यपान

मद्यपान करून विमानप्रवास करणं ही अजून एक गंभीर चूक आहे. थोडंफार मद्य घेतलं तरीही उंचीमुळे त्याचा परिणाम शरीरावर अधिक होतो. त्यामुळे काही लोक आक्रमक होतात किंवा बेशिस्त वागतात, ज्यामुळे संपूर्ण फ्लाइटमधील वातावरण तणावपूर्ण बनतं. त्यामुळे विमानात मद्यधुंद होणं टाळणं केव्हाही हिताचं असतं.

मोशन सिकनेस

जर तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास होत असेल, तर विमानाच्या मागच्या भागात बसणं टाळा. मागील सीट्स हलण्याच्या दृष्टीने अधिक अस्थिर असतात, त्यामुळे मळमळ, पोटात गडगडणं किंवा डोकेदुखी अशा तक्रारी वाढू शकतात. अशावेळी तुम्ही मध्यभागी किंवा समोरच्या भागात सीट निवडणं अधिक फायदेशीर ठरतं.

सीट बेल्ट

प्रवासादरम्यान सीट बेल्ट लावणं ही केवळ नियमबद्धता नाही, तर तुमचं सुरक्षेचं कवच असतं. हवामानातील बदलांमुळे अचानक हालचाल झाली, तर सीट बेल्ट नसल्यास अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे सीट बेल्टचा सिग्नल ऑन असताना तो लावणे अत्यावश्यक आहे.

विमानातील कर्मचारी

शेवटी, विमानातील कर्मचारी मग ते फ्लाइट अटेंडंट्स असोत वा पायलट हे सर्व तुमच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. त्यामुळे त्यांच्याशी वाद न घालता त्यांच्या सूचनांचं नीट पालन करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण सहकार्य करतो, तेव्हाच संपूर्ण प्रवास सुखकर आणि सुरक्षित बनतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!