SSC CHSL Jobs 2025: बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 3131 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा

Published on -

SSC CHSL Jobs 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ आणि कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 3131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

SSC CHSL Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: HQ-C1102/9/2025-C-1

परीक्षेचे नाव:

संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नाव आणि पदसंख्या
01.डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
02.कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
एकूण रिक्त जागा 3131 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • पद क्रमांक 01: 12वी (Mathematics) उत्तीर्ण
  • पद क्रमांक 02: बारावी उत्तीर्ण

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी : ₹100/-
  • एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला: फी नाही

महत्त्वाची तारीख:

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • परीक्षा (Tier-I): 08 ते 18 सप्टेंबर 2025
  • परीक्षा Tier-II: फेब्रुवारी/मार्च 2026

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://ssc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!