रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 जुलै 2025 पासून ‘या’ रेल्वे गाड्यांची भाडेवाढ, नवीन तिकीट दर आत्ताच जाणून घ्या

भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा ठरतो. पण आता रेल्वेच्या तिकीट दरात सुद्धा रेल्वे कडून वाढ करण्यात आली आहे.

Published on -

Railway Ticket : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे रेल्वेने काही गाड्यांच्या भाड्यात वाढ केली आहे. महत्त्वाची बाब अशी की ही नवीन भाडे वाढ एक जुलै 2025 पासून म्हणजेच पुढल्या महिन्यापासून लागू होणार आहे.

परिणामी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर थोडासा भार पडण्याची शक्यता आहे. तथापि, ही भाडेवाढ सरसकट राहणार नाही, काही श्रेणींमध्ये तिकीट दर कायम राहणार आहेत.

अशा परिस्थितीत आता आपण एक जुलै 2025 पासून कोणत्या रेल्वे गाड्यांमधील तिकीट दर वाढवण्यात आले आहेत, ते तिकीट दर किती वाढले आहेत याचाच सविस्तर आढावा या ठिकाणी घेणार आहोत.

या गाड्यांचे तिकीट दर वाढलेत  

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, एसी क्लासच्या भाड्यात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. एक्सप्रेस गाड्यांच्या एसी क्लासचे तिकीट दर प्रति किलोमीटर मागे दोन पैशांनी वाढवण्यात आले आहेत. यामुळे एसी क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडासा अतिरिक्त पैसा खर्च करावा लागणार आहे.

याव्यतिरिक्त मेल/एक्सप्रेस गाड्याच्या Non-AC कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील थोडा अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. कारण म्हणजे या गाड्यांमधील तिकीट दर आता प्रति किलोमीटर मागे 1 पैशाने वाढवण्यात आले आहेत. 

शिवाय, Second Class सामान्य द्वितीय श्रेणीचे तिकीट दर सुद्धा वाढवण्यात आले आहेत. पण 500 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट दर कायम राहणार आहेत.

जे प्रवासी 500 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करतील त्यांना प्रति किलोमीटर मागे अर्धा पैसे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. अर्थातच या नव्या दरवाढीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचा पैसा मोजावा लागू शकतो. 

कोणते तिकीट दर कायम राहणार?

रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार Suburban म्हणजे शहरी ट्रेनच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच मासिक सिझन तिकीटाच्या दरांमध्येही कोणताच बदल झालेला नाही यामुळे मासिक सीजन तिकीटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या निर्णयाचा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!