Tata Harrier EV टॉप व्हेरिएंटची खरी कहाणी ! पुण्याहून गोवा फक्त एका चार्जमध्ये ? पहा फीचर्स, रेंज आणि महिन्याचा खर्च

Published on -

भारतात इलेक्ट्रिक कार्सचं मार्केट वेगानं वाढतंय, आणि Tata Motors ने या गेममध्ये एक नवीन मॉडेल लॉन्च केलय ज्याचे नाव आहे Tata Harrier EV Empowered 75! ही गाडी फक्त लूकमध्येच नाही तर परफॉर्मन्स, फीचर्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्येही गेमचेंजिंग आहे. पण खरंच ही SUV घेणं परवडणारं आहे का? मासिक खर्च किती बसेल? चला, सगळं डीटेलमध्ये बघूया.

किंमत आणि ऑन रोड खर्च

Tata Harrier EV चं हे टॉप मॉडेल म्हणजे एक प्रीमियम EV अनुभव. याची एक्स-शोरूम प्राईस आहे ₹27.49 लाख. त्यावर रजिस्ट्रेशन (₹12,240) आणि इन्शुरन्स (₹1.33 लाख) धरला, तर ऑन रोड प्राईस होते ₹29.23 लाख.

जर तुम्ही सुमारे ₹4.5 लाख डाऊनपेमेंट दिलं, तर उरलेले ₹24.74 लाख लोनवर जातील. आता हे लोन जर 5 वर्षांसाठी घेतलं, तर मासिक EMI ₹52,567 च्या आसपास बसेल.

पण इथे थांबू नका, कारण गाडी घेतल्यानंतरही काही खर्च असतो – जसं की चार्जिंग खर्च, वेळोवेळी होणारी सर्व्हिसिंग, टायर्स, इतर माइनर टचअप्स. त्यामुळे एकूण महिन्याचा खर्च होऊ शकतो ₹55,000 ते ₹60,000 च्या आसपास.

रेंज आणि परफॉर्मन्स 

Harrier EV Empowered 75 मध्ये दिली आहे एक 75 kWh ची बॅटरी, जी एकदा फुल चार्ज केल्यावर 500+ किमी रेंज देते. म्हणजे पुण्याहून गोवा आरामात जाता येईल… आणि परतसुद्धा! गाडीचं अ‍ॅक्सेलरेशनसुद्धा इम्प्रेस करतं – 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 8 सेकंदांत! म्हणजे ‘EV म्हणजे स्लो’ हा मिथ इथे पूर्णपणे खोटा ठरतो. Top-Notch Features – एकदम Future Ready!

Harrier EV फीचर्स

Harrier EV च्या Empowered 75 व्हेरिएंटमध्ये जे फीचर्स मिळतात, ते premium ICE SUVs ना टक्कर देतील:

360° Camera View,
ADAS (Advanced Driver Assistance System),
Panoramic Sunroof,
12.3-inch Infotainment Touchscreen,
JBL Premium Sound System,
Wireless Android Auto & Apple CarPlay,
Ventilated Seats,
Multiple Drive Modes + Regenerative Braking,
Connected Car Features,

एकंदरीत, गाडीचं कॉकपिट पूर्णपणे डिजिटल आणि टेक-सेव्ही आहे!

डिझाईन आणि कलर व्हायब्रन्स

Harrier EV चं डिझाईन पाहून पहिल्यांदाच वाटतं की, Tata ने यावेळी डिझायनर्सना मोकळं रान दिलंय! क्लोज ग्रिल, एलईडी लाइट बार, आणि अगदी Sci-Fi vibes देणारा फ्रंट फेशिया – ही SUV रस्त्यावर आली की नजर वळणं अशक्य!

कलर ऑप्शन्स:

Signature White (Blue Accents),
Ocean Teal,
Graphite Grey,
Midnight Black,

कोण घेऊ शकतो ही गाडी ?

जर तुम्ही फ्युचरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल, आणि बजेट आहे सुमारे ₹4.5 लाख डाऊनपेमेंट + ₹55-60k मासिक खर्च, तर Harrier EV Empowered 75 नक्कीच योग्य चॉईस आहे. खास करून long-distance ड्रायव्हर्स, SUV लव्हर्स आणि टेक-सॅव्ही कस्टमर्ससाठी ही परफेक्ट गाडी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!