SBI FD News : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर अनेक जण देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एफडी करतात. गेल्या काही दिवसांमध्ये एसबीआयचे एफ डी चे व्याजदर काहीसे कमी झाले आहेत.
कारण म्हणजे आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी आजही एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इतर काही बँकांच्या तुलनेत एफडीवर चांगले व्याज देत आहे.

दरम्यान जर तुम्हाला एसबीआय मध्ये फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे कारण की आज आपण एसबीआयच्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
एसबीआयच्या 24 महिन्यांच्या म्हणजेच दोन वर्षांच्या एफडी योजनेत 2 लाखाची गुंतवणुक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
कशी आहे एसबीआयची 24 महिन्यांची एफडी योजना
जर तुम्हाला एक – दोन वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट राहील. कारण म्हणजे एसबीआय ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक आहे. स्वतः आरबीआय असा दावा करते.
आरबीआय नुसार एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक आहेत. यामुळे अनेकजण एसबीआय मध्ये एफडी करतात.
एसबीआय सध्या स्थितीला सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर करत आहे आणि यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 3.50 टक्क्यांपासून ते 7.10 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
म्हणजेच वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी साठीचे व्याजदर वेगवेगळे आहे. एसबीआयच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर यात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.45 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
मात्र याच दोन वर्षांच्या एफडी योजनेत जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी म्हणजेच 60 वर्षांवरील नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 6.95% दराने व्याज दिले जात आहे. म्हणजे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जाते.
दोन लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना 6.45% दराने दोन लाख 27 हजार 304 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 27 हजार 304 रुपये सामान्य ग्राहकांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
पण जर या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी दोन लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 6.95% दराने दोन लाख 29 हजार 551 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 29 हजार 551 रुपये जेष्ठ नागरिक ग्राहकांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.