Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी जुलै महिन्यात काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. खरे तर पुढील महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची होणारी हीच अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे कडून काही विशेष गाड्या देखील चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने देखीलच श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी अनेक विशेष गाड्या सुरू केले आहेत. दरम्यान मध्ये रेल्वेने भाविकांच्या सोयीसाठी आणखी तीन एकेरी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. अशा परिस्थितीत, आज आपण मध्य रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या याच 3 एकेरी विशेष गाडीबाबत डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मध्य रेल्वे चालवणार तीन विशेष गाड्या

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माध्यमातून पुणे – मिरज, मिरज – नागपूर आणि मिरज – लातूर या तीन एकेरी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यातील मिरज – लातूर ही गाडी सहा जुलै रोजी आणि इतर दोन विशेष गाड्या आठ जुलै रोजी चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या तीनही एकेरी विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मिरज – लातूर म्हणजे गाडी क्रमांक 01409 ही विशेष रेल्वे सहा जुलै 2025 रोजी चालवली जाणार आहे. या दिवशी ही गाडी मिरज रेल्वे स्थानकावरून सकाळी नऊ वाजता रवाना केली जाईल आणि त्याच दिवशी रात्री सात वाजून वीस मिनिटांनी ही गाडी आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच लातूर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे. ही गाडी या प्रवासादरम्यान आगर, कवठे महाकाळ, धालगांव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डूवाड, शेंद्री, बार्शी, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब, ढोकी, मुरूड, औसा रस्ता आणि हरंगुळ अशा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय पुणे – मिरज विशेष रेल्वे गाडी म्हणजेच गाडी क्रमांक 01413 ही गाडी आठ जुलै 2025 रोजी सकाळी सात वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे आणि दुपारी साडेबारा वाजता ही गाडी मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचेल. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही एकेरी विशेष गाडी लोणंद, सातारा, कराड, किर्लोसकरवाडी आणि सांगली या मार्गाने चालवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासोबतच मिरज – नागपूर एकेरी विशेष गाडी म्हणजेच गाडी क्रमांक 01213 ही विशेष रेल्वे आठ जुलै 2025 रोजी चालवली जाणार आहे. या दिवशी ही गाडी मिरज रेल्वे स्थानकातून दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी साडेबारा वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. ही गाडी श्रीक्षेत्र पंढरपूर सहित पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव सहित उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.