Top 5 Engineering colleges India : इंजीनियरिंग करायचीय? भारतातल्या सर्वात्तम 5 इंजिनिअरिंग कॉलेजची यादी

Published on -

इंजिनिअरिंग क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य कॉलेज निवडणं हा एक महत्त्वाचं टप्पा असतो. आजच्या स्पर्धात्मक युगात कुठल्या संस्थेत शिक्षण घ्यावं, हे ठरवताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो ज. जसे की दर्जेदार शिक्षण, संशोधनाच्या संधी, कॅम्पस प्लेसमेंट्स आणि जागतिक मानांकन यांचा यात समावेश होतो. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय संस्था क्रमवारी फ्रेमवर्क’ (NIRF) कडून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या यादीतून अशा उत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थांची निवड करता येते. २०२४ मधील NIRF रँकिंगमध्ये देशातील टॉप ५ इंजिनिअरिंग कॉलेजेसची यादी जाहीर झाली असून, ती पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.

देशातील टॉप ५ इंजिनिअरिंग कॉलेजेसची यादी पाहुयात

आयआयटी मद्रास


सर्वात वरच्या स्थानावर आहे आयआयटी मद्रास, म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास. चेन्नईमध्ये असलेली ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखली जाते. येथे शिक्षण घेणं हे अनेक विद्यार्थ्यांसाठी स्वप्न असतं. अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, संशोधनात सातत्याने मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या यशामुळे IIT मद्रासचा दर्जा उत्तम असा आहे.

आयआयटी दिल्ली


दुसऱ्या स्थानावर आहे आयआयटी दिल्ली. देशाच्या राजधानीत असलेली ही संस्था केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावाजलेली आहे. उच्च दर्जाचं अभ्यासक्रम रचनेपासून ते जागतिक विद्यापीठांच्या यादीत सातत्याने मिळणाऱ्या स्थानांपर्यंत IIT दिल्लीचं शिक्षणक्षेत्रातलं योगदान मोठं आहे. इथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची स्पर्धा असते.

आयआयटी मुंबई

तिसऱ्या क्रमांकावर असलेलं आयआयटी मुंबई म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रात नाव कमावण्याची संधी. मुंबईसारख्या औद्योगिक केंद्रात असलेली ही संस्था विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता, उद्योगजगतात थेट उतरवण्याची तयारी करते. इथलं संशोधन, प्रकल्प कामं, आणि स्टार्टअप्ससाठी मिळणारा पाठिंबा यामुळे IIT बॉम्बेचा दरारा वेगळाच आहे.

आयआयटी कानपूर


आयआयटी कानपूर, जे चौथ्या स्थानावर आहे, ही संस्था वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रगत मानली जाते. उत्तर प्रदेशात असलेली ही संस्था तिच्या आधुनिक तंत्रज्ञान सुविधांमुळे आणि शास्त्रशुद्ध संशोधनासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे तर नवकल्पनांवर काम करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात संधी दिल्या जातात.

आयआयटी खरगपूर

पाचव्या क्रमांकावर आहे आयआयटी खरगपूर. ही संस्था म्हणजे भारतातल्या पहिल्या IIT संस्थेचा इतिहास. पश्चिम बंगालमध्ये असलेली IIT-KGP ही केवळ शिक्षणासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध आहे. इथली अकॅडमिक स्ट्रक्चर, परदेशी विद्यापीठांशी असलेली भागीदारी आणि जागतिक दर्जाचे शिक्षक या संस्थेचं वेगळेपण अधोरेखित करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!