Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते का? मग आजचा हा लेख तुमच्याच कामाचा आहे. खरे तर भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात आणि यातील काही प्रजाती विषारी सुद्धा आहेत. तथापि आपल्या देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. यामुळे सापांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. दरम्यान जर तुम्हाला सुद्धा सापांची भीती वाटत असेल तर आज आपण अशा काही वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे घर सापांपासून सुरक्षित राहू शकते.
या पदार्थांच्या वापरामुळे सापांची भीती होणार दूर
राख : भारतात आजही ग्रामीण भागात घरापुढील अंगण शेणाने चालवले जाते. असे म्हणतात की, घरापुढील अंगण जर शेण टाकून सारावले असेल तर अशा घरात साप दिसण्याची भीती नसते. याशिवाय घराच्या आजूबाजूला चुलीतून निघणारी राख टाकल्यास देखील सापांपासून संरक्षण मिळू शकते. कारण की सापांना राखेवरून आणि शेणावरून सरपटणे आवडत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे असे केल्यास कीटक आणि माशा देखील दूर होतात.

लिंबाची पाने आणि माचीस : आपल्या प्रत्येकाच्या घरी माचीस असते. पण ही माचीस फक्त आग लावण्यासाठीच उपयोगाची ठरते असे नाही तर साप पळवण्यासाठी देखील याचा वापर होऊ शकतो. असे म्हणतात की लिंबाच्या पानांमध्ये कडूपणा असतो जो की सापांना मुळीच आवडत नाही आणि माचिसचा गंध सुद्धा सापांना आवडत नाही. यामुळे घराच्या कोपऱ्यात, दारात आणि आजूबाजूला कडुलिंबाची पाने आणि दोन-तीन काड्या ठेवल्यास साप घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाहीत.
तुरटी : तुरटी हा एक औषधी पदार्थ आहे. तुरटीचा वापर स्किन केअर प्रॉडक्ट मध्ये सुद्धा केला जातो. याशिवाय परंपरागत औषध निर्मितीसाठी तुरटीचा वापर होतो. तुरटीबाबत बोलायचं झालं तर तुरटी फक्त औषधी वनस्पतीच नाही तर सापांना दूर पळवण्याची एक जालीम औषधी सुद्धा आहे. तुरटी बारीक करून पाण्यात मिसळून तयार झालेले द्रावण घरात किंवा घराच्या आजूबाजूला फवारल्यास साप घरात घुसत नाहीत. तुरटी पासून तयार करण्यात आलेले द्रावण खिडक्याबाहेर, दाराबाहेर फवारायला हवे. कारण की तुरटीचा वास आणि यामध्ये असणारे काही रासायनिक गुणधर्म सापांना अजिबात आवडत नाही.
लवंग आणि दालचिनी : लवंग आणि दालचिनी हे औषधी पदार्थ आहेत सोबतच मसाल्याचेही पदार्थ आहेत. मसाला तयार करताना या पदार्थांचा वापर होतो. यामुळे हे पदार्थ प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाक घरात आढळतात. मात्र या औषधी पदार्थांना असणारा वास सापांना मुळीच आवडत नाही. यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी साप निघण्याची भीती वाटते, त्या ठिकाणी लवंग आणि दालचिनी ठेवल्यास सापाची भीती दूर होणार आहे.