‘ही’ आहेत भारतातील आणि परदेशातील टॉप इंजीनियरिंग कॉलेज ! इथून शिक्षण घेतलं म्हणजे लाईफ सेट म्हणून समजा

इंजीनियरिंगला ऍडमिशन घेणार असाल तर आजची बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. कारण आज आपण भारतातील तसेच परदेशातील इंजिनिअरिंग कॉलेज बाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Top Engineering Colleges : भारतात मेडिकल आणि इंजीनियरिंगमध्ये अनेक जण करिअर बनवतात. बारावीनंतर या दोन्ही क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान आज आपण इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतलेल्या आणि घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण भारतातील तसेच विदेशातील टॉप इंजीनियरिंग कॉलेज ची माहिती पाहणार आहोत.

ही आहेत भारतातील टॉप इंजीनियरिंग कॉलेज

आयआयटी मद्रास : तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील आयआयटी मद्रास ही देशातील एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. हे देशातील एक टॉप इंजिनिअरिंग कॉलेज असून येथून डिग्री कम्प्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराचे नोकरी मिळते.

आयआयटी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथील ही शैक्षणिक संस्था देखील देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये समाविष्ट आहे. येथून इंजीनियरिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांची लाईफ खऱ्या अर्थाने सेट होते.

आयआयटी बॉम्बे : महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे हे देखील या यादीत समाविष्ट आहे. हे देखील देशातील एक प्रमुख इंजीनियरिंग कॉलेज आहे.

आयआयटी कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ही शैक्षणिक संस्था देशातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजचा पर्याय सिलेक्ट करू शकता.

आयआयटी खरगपूर : पश्चिम बंगाल येथील हे इंजीनियरिंग कॉलेज देखील देशातील एक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज आहे.

आयआयटी रूडकी : उत्तराखंड राज्यातील हे इंजिनिअरिंग कॉलेज देखील देशातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखले जाते.

आयआयटी गुवाहाटी : आसाम राज्यातील गुवाहाटी येथील हे कॉलेज इंजीनियरिंग साठी बेस्ट ऑप्शन आहे.

आयआयटी हैदराबाद : तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील आयआयटी हे कॉलेज देखील अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

NIT तिरुचिरापल्ली : तामिळनाडू येथील हे कॉलेज इंजीनियरिंग साठी एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे. बारावीनंतर इंजीनियरिंग करायचे असेल तर तुम्ही या कॉलेजचा पर्याय सिलेक्ट करू शकता.

VIT वेल्लोर : तामिळनाडू राज्यातील वेल्लोर येथील हे कॉलेज देखील इंजिनिअरिंग साठी प्रसिद्ध आहे. येथून इंजिनिअरिंग केल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी लागते.

हि आहेत परदेशातील टॉप इंजीनियरिंग कॉलेज

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) : USA मधील केंब्रिज येथे स्थित हे कॉलेज देखील इंजीनियरिंग साठी बेस्ट आहे. परदेशातून इंजीनियरिंगचे शिक्षण घ्यायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठ : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी देखील इंजीनियरिंग साठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. विदेशातून इंजीनियरिंग पूर्ण करायचे असेल तर तुम्ही या कॉलेजचा पर्याय सिलेक्ट करू शकता.

युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो : कॅनडा येथील ही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. अनेक भारतीय विद्यार्थी देखील या यूनिवर्सिटी मधून शिक्षण घेत आहेत. तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या युनिव्हर्सिटी मधून तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता.

टेक्निकल युनिव्हर्सिटी म्युनिक : जर्मनीमधील हे कॉलेज इंजिनिअरिंग साठी बेस्ट ऑप्शन आहे. एब्रॉड जाऊन इंजीनियरिंग करायची असेल तर या कॉलेजचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहील.

इम्पेरियल कॉलेज लंडन : परदेशातून विशेषता लंडन मधून जर इंजिनिअरिंग करायची असेल तर या कॉलेजचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. ही लंडन मधील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!