लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार डबल हफ्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आषाढी एकादशीच्या आधीच लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून मोठी भेट दिली जाईल असे वृत्त हाती येत आहे. 

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली राज्य शासनाची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत.

जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आणि आता लाडक्या बहिणी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.

मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला यामुळे जून महिन्याचा आता कधी जमा होणार हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

मध्यंतरी जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच जमा केला जाईल असे म्हटले जात होते मात्र आता जून महिना संपण्यास फक्त दोन दिवसांचा काळ बाकी आहे आणि या जून महिन्याच्या 12 व्या हप्त्याबाबत अजूनही सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

यामुळे जून चा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. 

या दिवशी जमा होणार जून आणि जुलै महिन्याचा हप्ता 

रिपोर्टनुसार, जून महिना संपण्यास फक्त दोन दिवसांचा काळ बाकी आहे आणि यामुळे जून महिन्याचा बारावा हप्ता जुलै महिन्यात दिला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा झाला त्याचप्रमाणे जून महिन्याचा बारावा हप्ता सुद्धा जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

पण यावेळी महिलांना डबल हप्त्यांचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच जून आणि जुलै या दोन हप्त्यांचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा बारावा आणि तेरावा हप्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो.

म्हणजेच महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. परंतु या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही यामुळे जुलै महिन्यात जून महिन्याचा पैसा मिळणार की जून आणि जुलै या दोन महिन्यांचे पैसे मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. 

कधी जमा होणार जून आणि जुलै चा हप्ता?

खरे तर जून आणि जुलै या दोन महिन्यांचे पैसे सोबतच जमा होणार यासंदर्भात कोणतीच माहिती हाती आलेली आहे. तसेच जून महिन्याचा लाभ कोणत्या तारखेला मिळणार याबाबतही सरकारकडून काहीच घोषणा झालेली नाही.

पण मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर पुढील महिन्यात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जून आणि जुलै या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

जर समजा आषाढी एकादशीला सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचा निर्णय घेतला तर सहा जुलैच्या सुमारास या योजनेचे जून आणि जुलै या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!