Snake Viral News : पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते, पावसाळ्याच्या ऋतूत अगदीच अल्हाददायक वातावरण तयार होते. मात्र हे वातावरण मनाला जेवढ प्रभावित करत तेवढंच या वातावरणामुळे त्रास सुद्धा सहन करावा लागतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मानवी वस्तीत साप घुसण्याची भीती अधिक असते आणि त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटना वाढत असतात. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण अशा एका वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यापासून साप नेहमीच लांब राहतात. जर तुम्ही ही वनस्पती तुमच्या घराशेजारी लावली तर साप तुमच्या घरात चुकूनही घुसणार नाहीत.
या वनस्पती पासून साप लांब पळतात
जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ सपसण किंवा ईश्वरी या वनस्पतीची लागवड केली पाहिजे. ईश्वरी या वनस्पतीचे सायंटिफिक नाव एरिस्टोलोचिया इंडिका असे आहे.
ही वनस्पती प्रामुख्याने भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळते. ही एक अशी वनस्पती आहे जी की सापांना घराजवळ येण्यापासून रोखतेच, शिवाय साप चावला तरी त्याच्या पानांचा रस विष निष्क्रिय करतो.
ही एक औषधी वनस्पती आहे. मात्र ही एक विषारी वनस्पती आहे. ही विषारी वनस्पती असली तरी देखील तिच्या पानांचा आणि मुळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो अशी माहिती देण्यात आली आहे.
विशेषतः या वनस्पतीचा वापर हा सर्प दंशावर उतारा म्हणून केला जात असतो. फार पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर सापचे विष उतरवण्यासाठी केला जात आहे. खरेतर पावसाळ्यात, जेव्हा सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरते तेव्हा ते बिळाच्या बाहेर पडतात.
बिळाच्या बाहेर आल्यानंतर साप पहिल्यांदा आश्रय शोधतात आणि मग अन्नाच्या भटकंतीमध्ये मानवी वस्तीमध्ये सुद्धा घुसतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या घरात साप शिरेल अशी भीती वाटत असेल तर तुम्ही या वनस्पतीची लागवड करू शकता.
तुम्ही तुमच्या अंगणात किंवा परसबागेत ही वनस्पती लावू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे ही औषधी वनस्पती तुम्हाला नर्सरीमध्ये शंभर रुपयांना मिळू शकते. नक्कीच जर तुम्ही हे शंभर रुपयांचे रोपटे घरी आणलेत आणि तुमच्या अंगणात किंवा परस बागेत याची लागवड केली तर सापांची भीती काही प्रमाणात कमी होणार आहे.