DMER Jobs 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन सचालनालयात 1107 जागांसाठी भरती! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती..

Published on -

DMER Jobs 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन सचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 जुलै 2025 आहे या तारखेपुर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

DMER Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जहिरात/आस्था-४/८५३/२

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.ग्रंथपाल05
02.आहारतज्ञ18
03.समाज सेवा अधीक्षक (वैद्यकीय)135
04.भौतिकोपचार तज्ञ17
05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ181
06.इसीजी तंत्रज्ञ84
07.क्ष किरण तंत्रज्ञ94
08.सहाय्यक ग्रंथपाल17
09.औषध निर्माता207
10.दंत तंत्रज्ञ09
11.प्रयोगशाळा सहाय्यक170
12.क्ष किरण सहायक35
13.ग्रंथपाल सहाय्यक13
14.प्रलेखाकार / ग्रंथसूचीकार /डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर36
15.वाहन चालक37
16.उच्च श्रेणी लघुलेखक12
17.निम्न श्रेणी लघुलेखक37
एकूण रिक्त जागा1107 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत त्या संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 09 जुलै 2025 रोजी 18 ते 37 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :

मुंबई / महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.med-edu.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!