Cricket Facts : सध्या भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट टीम कसोटी मालिका खेळत आहे. महत्त्वाची बाब अशी की, रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडूंनी रिटायरमेंट घेतल्यानंतर हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. या दौऱ्यावर शुभमन गिल यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने पहिलाच सामना गमावला आहे. यामुळे आज आपण पदार्पणाच्या सामन्यात विजयी होणारे 10 भारतीय कसोटी कर्णधार कोणते आहेत ? याची माहिती जाणून घेणार आहोत.

हे आहेत पदार्पणाच्या सामन्यात विजयी होणारे 10 भारतीय कसोटी कर्णधार

पॉली उमरीगर : हे भारतीय संघाचे पहिले कसोटी कर्णधार आहेत ज्यांना आपल्या पदार्पणाच्या सामन्यात विजय मिळाला होता. 1955 मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटीचा सामना झाला होता आणि यात पॉली उमरीगर यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवले.

सुनील गावस्कर : या यादीत दिग्गज सुनील गावस्कर यांचा सुद्धा समावेश होतो. सुनील गावस्कर यांनी कसोटी कर्णधार पदाची धुरा सांभाळल्यानंतर आपला पहिला सामना जिंकला होता. त्यांनी 1975 – 76 मध्ये न्यूझीलंडच्या विरोधात पहिल्यांदा कसोटी कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती.

रवी शास्त्री : या यादीत रवी शास्त्री यांचा सुद्धा समावेश होतो. खरे तर रवी शास्त्री यांनी एकाच कसोटी सामन्यात भारतीय संघाची कॅप्टनसी केली होती आणि यात ते विजयी झालेत. हा सामना वेस्टइंडीज विरुद्ध झाला होता.

सचिन तेंडुलकर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचाही या यादीत समावेश होतो. खरे तर मास्टर ब्लास्टर यांचा कॅप्टनसीचा रेकॉर्ड एवढा खास नाही. पण त्यांनी कसोटी कर्णधार म्हणून खेळलेला पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधात जिंकला होता.

सौरभ गांगुली : सौरभ गांगुली उर्फ दादा यांनी सुद्धा कसोटी कर्णधार म्हणून खेळलेला पहिला सामना जिंकला आहे. 2001 मध्ये दादा यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने बांगलादेशला हरवले होते.

वीरेंद्र सेहवाग : वीरेंद्र सेहवाग हे एक जोरदार फटकेबाजी करणारे फलंदाज होते. पण त्यांनी कधीच भारतीय संघाचे नियमित नेतृत्व केले नाही. मात्र श्रीलंके विरोधात त्यांनी पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून संघाची धुरा उचलली होती आणि यात ते विजयी सुद्धा झाले होते.

अनिल कुंबळे : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 2006 साली अनिल कुंबळे यांनी पहिल्यांदा कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळली. हा सामना पाकिस्तान विरोधात खेळवला गेला होता आणि यात अनिल कुंबळे यांच्या संघाने विजय सुद्धा मिळवला होता.

महेंद्रसिंग धोनी : एमएसडी यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. धोनी यांना 2008 मध्ये पहिल्यांदा कसोटी कर्णधार पदाची धुरा मिळाली. साऊथ आफ्रिका विरुद्ध त्यांनी कसोटी कर्णधार म्हणून भारतीय संघाची धुरा सांभाळली आणि यात ते विजयी सुद्धा झाले होते.

अजिंक्य रहाणे : 2017 साली मराठमोळ्या अजिंक्यने विराट कोहली अनफिट असल्याने भारतीय कसोटी संघाची धुरा सांभाळली होती आणि कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात ते विजयी सुद्धा झालेत. हा सामना धर्मशाळा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला गेला होता.

रोहित शर्मा : रोहित शर्माचा टेस्ट कॅप्टनसी डेब्यु 2022 मध्ये झाला होता. त्यांनी श्रीलंका विरुद्ध टेस्ट कॅप्टनसी डेब्यु केला होता आणि हा सामना त्यांनी जिंकला सुद्धा.