कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं ही सध्या अनेकांच्या आरोग्याची सर्वात मोठी चिंतेची बाब बनली आहे. रोजचं धावपळीचं जीवन, बाहेरचं जंक फूड, शारीरिक हालचालींचा अभाव आणि सततचा ताण-तणाव या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलवर होतो. कोलेस्टेरॉल वाढत गेलं की हृदयरोगाचा धोका वाढतो, रक्तवाहिन्या बंद होतात, आणि मग आरोग्यावर मोठं संकट कोसळतं. पण, आपल्या स्वयंपाकघरातच असलेल्या काही देशी उपायांनी तुम्ही कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवू शकता, आणि त्याचे परिणाम अगदी पहिल्या दिवसापासूनच जाणवू लागतात.

ओट्स
सकाळी दिवसाची सुरुवात जर तुम्ही ओट्स खाऊन केली, तर तुमच्या हृदयाचे आरोग्य खूप चांगले राहते. ओट्समध्ये सोल्युबल फायबर असतं, जे वाईट कोलेस्टेरॉल शोषून घेण्यास मदत करतं आणि ते शरीरातून बाहेर टाकण्याचं काम करतं. त्यामुळे दररोजची एक वाटी ओट्स ही तुमच्यासाठी एक आरोग्यदायी सवय ठरू शकते.
सुके मेवे
तसंच, सुके मेवे विशेषतः बदाम, अक्रोड आणि काजू हे देखील कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. रोज फक्त 5-6 बदाम किंवा अक्रोड खाल्ल्याने तुमच्या हृदयासाठी चांगलं संरक्षण तयार होतं.
लसूण
पण घराघरात स्वयंपाकात वापरला जाणारा साधा लसूण याबाबतीत सर्वात जास्त गुणकारी आहे. लसणामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तवाहिन्यांमधील साचलेलं कोलेस्टेरॉल वितळवण्यासाठी मदत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 लसणाच्या पाकळ्या पाण्यासोबत घेतल्यास केवळ कोलेस्टेरॉलच नाही, तर रक्तदाब आणि हृदयविकाराच्या शक्यताही कमी होतात.
ही सगळी देशी उपचारपद्धती फक्त कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी नाही, तर शरीरात नैसर्गिक संतुलन राखण्यासाठीही खूप उपयुक्त आहे.