Bank Of Baroda मध्ये 2,00,000 रुपये जमा करा, 47,000 रुपयांचे व्याज मिळणार ! ‘ही’ योजना ठरणार फायदेशीर

सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करणारे लोक हैराण आहेत, कारण म्हणजे यावर्षी एफडी व्याज दरात मोठी कपात झाली आहे. देशभरातील विविध बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केले आहेत मात्र आजही बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना चांगले व्याज देते.

Published on -

Bank Of Baroda FD Scheme : मागील वर्षी एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळालेत. यामुळे गेल्या वर्षी एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. पण यंदा मात्र अगदी सुरुवातीलाच देशभरातील बँकांकडून एफडी व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

आरबीआयने यावर्षी रेपो रेटमध्ये तब्बल एक टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर देशभरातील बँकांनी आपल्या विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी केले आहेत यासोबतच एफडी व्याजदरातही कपात करण्यात आली आहे.

पण आजही सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे आणि यामुळे अनेकजण बँक ऑफ बडोदा मध्ये एफडी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आज आपण बँक ऑफ बडोदाच्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदाचे एफडीचे व्याजदर कसे आहेत?

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना सध्या स्थितीला सात दिवसापासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर साडेतीन टक्क्यांपासून ते 7.20 टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहे.

हे व्याजदर एफडीच्या कालावधीनुसार चेंज होतात. बँकेकडून एक वर्ष ते तीन वर्ष कालावधीच्या एफडीत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 6.50% पासून ते 7.10% पर्यंतचे व्याज दिले जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना 444 दिवसांच्या एफडीवर 6.60% ते 7.20% एवढे व्याज देते.

ही बँक सामान्य ग्राहकांपेक्षा म्हणजे 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्के आणि अति जेष्ठ नागरिक ग्राहकांना 0.60% अधिकचे व्याज देते. 

या योजनेत 2 लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार 47 हजाराचे व्याज 

जर बँक ऑफ बडोदाच्या तीन वर्षांच्या एफडी मध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सामान्य ग्राहकांना दोन लाख 42 हजार 681 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 42,681 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

जर तुम्ही जेष्ठ नागरिक ग्राहकांच्या नावाने म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांच्या नावाने तीन वर्षांच्या एफडी मध्ये दोन लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 2,46,287 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 46,287 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

पण जर बँक ऑफ बडोदाच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत अति जेष्ठ नागरिकांनी 2 लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजे तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर दोन लाख 47 हजार 15 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 47 हजार 15 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

म्हणजेच बँक ऑफ बडोदाची तीन वर्षांची एफडी योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे, विशेषता ही योजना ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी अधिक फायद्याची राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!