तुमचं परदेशात नव्यानं जीवन सुरू करण्याचं स्वप्न अजूनही अपुरं आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच एक मोठी संधी ठरू शकते. कारण जगातले काही सुंदर आणि कमी लोकसंख्या असलेले देश आता थेट लोकांना बोलावत आहेत. विशेष म्हणजे या देशांकडून राहायला घर आणि पैसे देखील मिळणार आहेत.

ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आज जगात अशी ठिकाणं आहेत जिथे सरकारं स्वतः पुढे येऊन लोकांना वसाहत बसवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. या देशांचा उद्देश अगदी साधा आहे, लोकवस्ती टिकवून ठेवणं आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकटी देणं.
अँटिकिथेरा बेट
ग्रीसच्या एका नितळ निळ्या समुद्रकिनाऱ्याच्या छोट्याशा बेटावर सुरू झालेली ही संकल्पना सध्या सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आहे. अँटिकिथेरा नावाचं हे बेट, जे फक्त 39 लोकांच्या उपस्थितीनं अस्तित्वात आहे, आता नव्या रहिवाशांसाठी तयार आहे.
येथे राहायला यायचं असेल तर सरकार घरही देतंय आणि थोडीफार आर्थिक मदतही करतंय. अर्थात, जर तुमच्याकडे बेकरी चालवण्याचं, मासेमारीचं किंवा अशा एखाद्या उपयुक्त कौशल्याचं ज्ञान असेल, तर तुम्हाला इतरांपेक्षा प्राधान्य दिलं जाईल. समुद्राच्या कुशीत वसलेलं हे बेट, शांतता आणि नैसर्गिक सौंदर्यानं भरलेलं आहे.
अल्बिनेन
याचपद्धतीनं स्वित्झर्लंडमधलं अल्बिनेन हे गावही आता लोकांना आपलंसं करत आहे. स्वित्झर्लंडसारख्या सुंदर देशात स्थायिक होण्याची संधी अनेकांना स्वप्नासारखी वाटते, पण अल्बिनेन गावात ही संधी प्रत्यक्षात उतरवली जात आहे. स्थानिक प्रशासनाने जाहीर केलं आहे की जर एखादं कुटुंब चार सदस्यांसह इथे येऊन राहिलं, तर त्यांना जवळपास $60,000 (भारतीय रुपयांत जवळपास 50 लाख) पर्यंत मदत दिली जाईल. यासाठी काही अटी आहेत, जसं की तुम्हाला येथेच काही वर्षं वास्तव्य करावं लागेल आणि घर विकत घ्यावं लागेल.
इटलीतील प्रेसिचे शहर
या यादीत तिसरं नाव आहे इटलीमधल्या प्रेसिचे शहराचं. इथे अनेक जुनी घरे रिकामी आहेत, आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनाने ही घरे नव्या लोकांना विकत घेण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. येथे राहायला यायचं असल्यास, तुम्हाला सुमारे $30,000 (जवळपास 25 लाख रुपये) पर्यंत मदत मिळू शकते. ज
या संपूर्ण संकल्पनेमागचं मूळ कारण म्हणजे लोकसंख्येतील घट. अनेक युरोपीय गावं आणि शहरं आज रिकामी पडत चालली आहेत. लोक शहरांकडे, उद्योगांकडे वळले आहेत आणि ग्रामीण भाग ओस पडत चालले आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनांना इथली संस्कृती, जीवनशैली आणि व्यवसाय पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी अशा योजना आणाव्या लागत आहेत.