तब्बल 200 ते 250 वर्षांहूनही अधिक काळ जगतात कासव, नेमकं काय आहे त्यांच्या दीर्घायुष्याचं गुपित? वाचा!

Published on -

जगात काही प्राणी असे असतात, ज्यांचं अस्तित्व आपल्याला थक्क करून टाकतं. त्यातला एक सुंदर, शांत आणि विस्मयकारक प्राणी म्हणजे, कासव. हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींमध्ये कासवाला दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. पण हे फक्त लोककथा किंवा धार्मिक विश्वासापुरतं मर्यादित नाही. खरोखरच, कासवाचं जीवन इतकं लांब असतं की ते एकदा जन्मलं, की शतकानुशतकं त्याच्या अस्तित्वाचं साक्षीदार ठरतं. पण प्रश्न हा पडतो की, अखेर असं काय असतं त्यांच्या शरीरात, जे त्यांना 100 ते 250 वर्षांपर्यंत जगण्याची ताकद देतं?

जगातील सगळ्यात जास्त काळ जगणाऱ्या प्राण्यांमध्ये कासवांचा वरचष्मा आहे. वैज्ञानिक अहवालांनुसार, अनेक प्रजाती 150 ते 200 वर्षांपर्यंत जगतात. पण त्याहूनही अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘अल्डाब्रा कासव’ ही प्रजाती. यातील एक कासव तब्बल 256 वर्षं जगलं. हे कासव सेशेल्स बेटावर आढळून आलं होतं आणि त्याच्या शरीररचनेवर झालेल्या अभ्यासातून वैज्ञानिकांना कासवाच्या दीर्घायुष्याचे अनेक पैलू उलगडता आले.

शास्त्रज्ञ काय म्हणतात?

शास्त्रज्ञ म्हणतात की, हे दीर्घायुष्य केवळ नशीब किंवा अनुकूल हवामानामुळे मिळालेलं नाही, तर त्यामागे त्यांचं शरीराचं विशेष जैविक बांधकाम, जनुक रचना आणि अत्यंत संथ जीवनशैली कारणीभूत आहे. कासवाच्या शरीरात वृद्धत्वाशी लढण्याची क्षमता खूपच जबरदस्त असते. त्यांच्या पेशींचं विघटन फारच मंदगतीने होतं, म्हणजे त्यांच्या शरीरात “वय वाढणं” ही प्रक्रिया फार उशिरा सुरू होते. म्हणजेच, ज्या वयात इतर प्राणी थकवा, आजार आणि शरीराची झीज अनुभवतात, त्या वयात कासव मात्र शांतपणे जगत असतं.

कासवांचं जड आणि कठीण कवच हेही त्यांच्या दीर्घायुष्यात मोठी भूमिका बजावतं. हे कवच त्यांच्या अंतर्गत अवयवांना कोणत्याही बाह्य आघातापासून सुरक्षित ठेवतं. धोका निर्माण झाला की ते लगेच स्वतःला कवचात लपवतात, अशा प्रकारची नैसर्गिक सुरक्षा फार थोड्या प्राण्यांना लाभलेली आहे.

कासवांची लाईफस्टाइल

एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची लाइफस्टाइल. कासव हे संथ चालणारे आणि शांत प्राणी आहेत. ना फार हालचाल, ना फार उत्साह. त्यांची ही धीम्या गतीची जीवनशैली त्यांच्या शरीरावर ताण येऊ देत नाही, ज्यामुळे त्यांच्या पेशींना वेळ मिळतो स्वतःला पुन्हा दुरुस्त करण्याचा. याच दुरुस्ती प्रक्रियेमध्ये त्यांच्या डीएनएमध्ये असलेले खास जनुकीय घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. हे जनुक पेशींच्या झिजलेल्या भागांची दुरुस्ती करतात आणि वृद्धत्वाला थोपवतात.

याव्यतिरिक्त, जर लहानपणापासूनच कासवाची नीट काळजी घेतली गेली योग्य आहार, स्वच्छता, हवामान तर ते कोणत्याही मोठ्या आजाराशिवाय शतकभर सुखात जगतात. म्हणूनच अनेक पाळीव कासवांचे वय 100 वर्षांहूनही जास्त असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!