रक्तातील साखरेची पातळी 300 च्या वर गेली असेल तर तर तुमच्यासाठी ही माहिती खूप उपयोगी ठरू शकते. मधुमेह म्हणजे केवळ साखरेची वाढती पातळी नाही, तर ती आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत असते. विशेषतः हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ही समस्या तरुण वयोगटातदेखील तीव्रतेने दिसून येते. एकेकाळी हा आजार “वयस्करांचा” मानला जात असे, आज ती मर्यादा पार झाली आहे. खाण्याच्या सवयी, ताणतणाव, कमी व्यायाम आणि झपाट्याने बदलणाऱ्या जीवनपद्धतीमुळे आता हा आजार अगदी 20-25 वर्षांच्या तरुणांनाही बळावत आहे.

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी 300-400 च्या पुढे जाते, तेव्हा ती केवळ एक वैद्यकीय चिंता राहात नाही, तर तो शरीरासाठी गंभीर इशारा ठरतो. अशा स्थितीत डोळ्यांवर परिणाम होतो, मूत्रपिंड निकामी होऊ शकते, आणि मेंदूशी संबंधित नसा क्षतिग्रस्त होण्याची शक्यता वाढते. यामुळेच ही वेळ फक्त औषध घेण्याची नसते, तर जीवनशैली आणि आहारावर गंभीरपणे लक्ष देण्याची असते.
आपल्याकडे आयुर्वेदात अशा काही वनस्पती आहेत ज्या नैसर्गिक इन्सुलिनसारखे काम करतात. त्यातीलच काही पाने आहेत जी तुम्ही घरच्या घरी सहज वापरू शकता.
बेलाचं पान
सर्वप्रथम नाव घ्यावं लागेल बेलाच्या पानाचं. बेलाचं पान म्हणजे आपल्या पारंपरिक पूजेतही वापरलं जाणारं पवित्र पान, पण त्यात औषधी गुणही असतात. आयुष मंत्रालयाच्या मते, हे पान शरीरात नैसर्गिक इन्सुलिन निर्माण होण्यास मदत करतं आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोज पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतं. तुम्ही हे पान चावून खाऊ शकता किंवा त्याचा रसही घेऊ शकता.
कुंद्रूची भाजी
याशिवाय, कुंद्रू ही भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फारच फायदेशीर आहे. या छोट्याशा भाजीमध्ये असलेले हायपोग्लायसेमिक घटक साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. भारतात अनेक ठिकाणी ती सहज मिळते, आणि दररोजच्या आहारात समावेश करणं सोपंही आहे.
तमालपत्र
तमालपत्र म्हणजे आपल्या जेवणात सुगंधासाठी घातलं जाणारं एक पान, पण त्याचं औषधी मूल्यदेखील मोठं आहे. मधुमेह असलेल्या लोकांनी हे पान त्यांच्या जेवणात नियमितपणे वापरल्यास, साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.
मेथीची कोवळी पाने
त्याचप्रमाणे, मेथीची कोवळी पाने हा देखील एक सोपा, घरगुती आणि प्रभावी उपाय आहे. या पानांमध्ये रक्तातील साखर लवकर कमी करण्याची क्षमता असते. अनेक वेळा, केवळ 2 तासांतच परिणाम दिसून येतो. तुम्ही याचा रस घेऊ शकता किंवा भाजी म्हणून जेवणात समाविष्ट करू शकता.
मात्र, कोणताही नवीन उपाय सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. कारण, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, आणि मधुमेहाचा प्रकारही. त्यामुळे घरगुती उपायांसोबत व्यायाम, योग्य आहार आणि औषधांचं नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे.