Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात पुण्यातील दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांना केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. 25 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनाज ते चांदनी चौक आणि रामवाडी ते वाघोली पर्यंतच्या पुणे मेट्रोच्या 2 विस्तारित मार्गांना मान्यता देण्यात आली आहे.
यासह, आता निविदा प्रक्रिया सुद्धा लवकरच सुरू होऊ शकते. दुसरीकडे, पुण्यातील आणखी दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्ग प्रकल्पांना आगामी काळात केंद्राकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता आपण आणखी कोणत्या दोन मेट्रोमार्ग प्रकल्पांना केंद्राकडून मंजुरी मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

या दोन प्रकल्पांना लवकरच केंद्राची मंजुरी
पुणे मेट्रोच्या 2 विस्तारित मेट्रो मार्गांना 25 जून 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता खराडी-स्वारगेट-खडकवासला आणि एसएनडीटी-वारजे-माणिकबाग या दोन्ही मेट्रो मार्गाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या दोन्ही कॉरिडॉर ला महाराष्ट्र राज्य सरकारने आधीच मान्यता दिलेली आहे.
राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर हे दोन्ही प्रकल्प पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड ( PIB ) म्हणजे सार्वजनिक गुंतवणूक मंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांना अजून पीआयबी कडून आणि केंद्राकडून मंजुरी मिळालेली नाही मात्र लवकरच हेही प्रकल्प मंजूर केले जातील अशी शक्यता आहे.
दरम्यान या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर मग या प्रकल्पांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर मग याचे काम सुरू होणार आहे. दरम्यान आता आपण या दोन्ही प्रकल्पांबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे खराडी – स्वारगेट – खडकवासला प्रोजेक्ट?
खराडी – स्वारगेट – खडकवासला मेट्रो मार्गाबाबत बोलायचं झालं तर हा मेट्रो मार्ग 25.65 किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गात एकूण 22 स्थानके विकसित केली जाणार आहेत. या मेट्रो मार्गात खराडी चौक, साईनाथ नगर चौक, हडपसर रेल्वे स्टेशन, मगरपट्टा नॉर्थ, मगरपट्टा मेन,
मगरपट्टा साउथ, हडपसर, रामटेकडी, फातिमानगर, रेस कोर्स, पुणे कँटोन्मेंट बोर्ड, 7 लव्ह चौक, स्वारगेट नोर्थ, दांडेकर पुल, देशपांडे उद्यान, राजाराम ब्रिज, हिंगणे चौक, माणिकबाग, धयारी फाटा, नांदेड सिटी, दळवेवाडी, खडकवासला ही 22 स्थानके विकसित केली जाणार आहेत.
SNDT – वारजे – माणिक बाग मेट्रो मार्ग कसा आहे?
हा मेट्रो मार्ग 6.11 किलोमीटर लांबीचा असून यावर 6 स्थानके विकसित केली जाणार आहेत. ही एक Spur लाईन आहे. या मार्गावर पौडफाटा, कर्वे पुतळा, धानुकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे आणि दौलत नगर ही स्थानक विकसित केली जाणार आहेत.