श्रीगोंदा- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली विकास कामांचा आढावा घेत योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहत शासकीय कार्यालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली तसेच कार्यालयाची स्वच्छता, अभिलेखांची स्थिती आणि कामकाज यावर लक्ष केंद्रित करत कामकाजाबाबत सूचना केल्या.
श्रीगोंदा तहसील कार्यालयातील अपूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असून विनंती बदली एमपीएससी मार्फत भरती झालेल्यांना नियुक्ती देणार. त्यानंतर भिंगाण येथील घनकचरा डेपो डेपोला भेट देऊन कामातील त्रुटी बाबत चर्चा करत संबंधित विभागाला सूचना केल्या.

लोणीव्यंकनाथ येथील सौरऊर्जा प्रकल्प जागा तसेच येथील वूमेन्स फार्मर प्रोडूसर कंपनीला भेट देऊन समाधान व्यक्त केले. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत सखाराम यदु खेतमाळीस यांच्या डाळिंब फळबाग शेतीला भेट देत पाहणी केली.
शहीद जवानांच्या कुंटुबांना पाच एकर जमीन देणेसाठी शासनाची सकारात्मक भुमिका आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर तहसीलदार सचीन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.