Ahilyanagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर आणि धबधब्यावर ट्रिपचे आयोजन करत असतात. दरम्यान जर तुम्हालाही या पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे असेल तर तुमच्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील रंधा धबधबा एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील हा तोच धबधबा आहे ज्या धबधब्यावर बॉलीवूडचे भाईजान अर्थातच सलमान खानच्या एका चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

भंडारदरा येथील रंधा धबधबा यामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे आणि येथे महाराष्ट्रासहीत देशभरातील कानाकोपऱ्यातील पर्यटक पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गर्दी करतात. या धबधब्याला नेकलेस फॉल या नावाने सुद्धा ओळखले जाते.
रंधा धबधब्यावर सलमान खानच्या कोणत्या गाण्याच शूटिंग झालंय?
मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या कुर्बान चित्रपटाच्या एका गाण्याच शूटिंग इथं करण्यात आल आहे. कुर्बान हा एक सुपरहिट हिंदी चित्रपट होता. दरम्यान याच चित्रपटातील ‘मै जब जब तुझको पुकारु’ या सुपरहिट गाण्याचं या धबधब्यावर चित्रीकरण करण्यात आले आहे. या गाण्यात दाखवण्यात आलेला सुंदर परिसर रंधा धबधब्याचा आहे. यामुळे हा धबधबा नेहमीच चर्चेत राहतो.
मुंबई, पुण्यापासून जवळच आहे
अहिल्यानगर जिल्ह्यातील हा धबधबा मुंबई शहरापासून अवघ्या 177 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे तर पुणे शहरापासून हा धबधबा 156 किलोमीटर अंतरावर आहे. अर्थातच मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांना वनडे ट्रिप साठी या धबधब्याचे डेस्टिनेशन एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा या ठिकाणाहून हा धबधबा फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा धबधबा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चांगला प्रवाहित होत असतो आणि येथील दृश्य खरच नयनरम्य असते.
डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटकांची येथे वर्दळ पाहायला मिळते. या ठिकाणी फक्त सलमान खानच्या कुर्बान चित्रपटातील गाण्याच शूटिंग पूर्ण झालंय असं नाही तर इतरही अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांच इथे चित्रीकरण झाल आहे.
खरे तर, या परिसराचे नयनरम्य दृश्य तुम्हाला बाराही महिने पाहायला मिळते पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील सुंदरता आणखी खुलते. हा अहिल्या नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा 50 मीटर उंचीवरून कोसळतो.