मीठाचा वापर फक्त चव वाढवायला नाही, ‘या’ 8 जादुई कामांमध्येही वापरून बघा!

Published on -

घरातली स्वच्छता आणि सुगंध टिकवणं हे रोजच्या आयुष्यातलं एक मोठं आव्हान असतं. आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरतो. केमिकल्स, क्लिनर, फ्रेशनर्स पण तरीही कधी ना कधी अस्वच्छता आणि दुर्गंधी डोकं वर काढतातच. अशा वेळी तुमच्या स्वयंपाकघरात असलेला छोटा पण जादुई घटक कमाल करू शकतो. अगदी रोजच्या जेवणात चव आणणारं साधं मीठ, तुमचं घर स्वच्छ आणि सुगंधित ठेवण्यात एक मोठा हातभार लावू शकतं.

अनेकांना वाटतं की मीठ फक्त जेवणासाठीच उपयोगी आहे, पण त्याचा वापर स्वच्छतेपासून ते दुर्गंधी नष्ट करण्यापर्यंत, अगदी अडकलेल्या ड्रेनपासून टाइल्सच्या चमकदारपणापर्यंत होऊ शकतो. कधी तुमच्या किचनच्या सिंकमधून अजीबसा वास येतो का? किंवा ग्रीस चिकटून बसलंय? मग थोडं भरड मीठ आणि लिंबाचा रस घेऊन ते स्वच्छ घासून बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

ड्रेनची समस्या

बाथरूममधला ड्रेन अडकला की किती त्रास होतो ना? पण मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र करून गरम पाण्याने ते टाकलं, की काही मिनिटांत ड्रेन मोकळा होतो. काहीही खर्च न करता, कोणतंही रासायनिक उत्पादन न वापरता.

किचनची स्वच्छता

मीठाचा आणखी एक चमत्कारी उपयोग म्हणजे स्वयंपाकघरातील घाण आणि चिकटपणा दूर करणं. मीठ आणि व्हिनेगरची पेस्ट बनवा, स्लॅबवर किंवा गॅसवर लावा, आणि मग स्क्रब करा. अगदी जुने, जळालेले डागही गायब होतील. त्याचप्रमाणे, भांडी घासायला वापरला जाणारा स्क्रबरसुद्धा बॅक्टेरियामुक्त करायचा असेल, तर गरम पाण्यात मीठ टाका आणि स्पंज त्यात भिजवा.

फ्रिजमधली दुर्गंधी

कपडे धुताना घामाचा वास कायम राहतो का? तर धुण्यापूर्वी त्यांना थोडं मीठ घातलेल्या पाण्यात भिजवा. फ्रीजमध्ये जर अन्नाचा वास मिसळून नकोसा होत असेल, तर एका छोट्या वाटीत मीठ ठेवा ते वास शोषून घेतं आणि फ्रिजमधली दुर्गंधी नाहीसी होते.

टाइल्स आणि बुटातील वास

घरातली टाइल्स किंवा फरशी जर मळलेली आणि बेरंग वाटत असेल, तर मीठ आणि बेकिंग सोड्याची पेस्ट लावून थोडा वेळ स्क्रब करा. तुमच्या टाइल्समध्ये नवा उजाळा येईल. सर्वात शेवटी, जो उपयोग अनेकांना माहिती नसेल बूटांमधून येणारा घामाचा वास. रात्रभर बूटांच्या आत मीठ ठेवून बघा, सगळा ओलावा आणि वास अदृश्य होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!