भारताची स्वदेशी ‘धनुष’ तोफ बोफोर्सपेक्षा किती प्रगत आणि घातक? वाचा तिची वैशिष्ट्ये!

Updated on -

युद्धभूमी म्हणजे केवळ रणधुमाळी नव्हे, ती तंत्रज्ञान, धैर्य आणि रणनीतीची कसोटी असते. या रणांगणावर एखाद्या देशाची ताकद केवळ सैनिकांच्या संख्येवरून नव्हे, तर त्यांच्या हातात असलेल्या शस्त्रास्त्रांवरून ठरते. आणि अशा सर्व शस्त्रांमध्ये “तोफा” विशेषतः हॉवित्झर तोफा अजूनही एक दहशतीचं अस्त्र मानल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण झालेल्या या तोफा आता इतक्या अचूक, दूरवर मारा करणाऱ्या आणि धोकादायक बनल्या आहेत की त्यांच्याशिवाय कोणतेही युद्ध अपूर्ण वाटते.

पूर्वी तोफा म्हणजे काही वजनदार धातूच्या गोळ्या डागणारे भले मोठे यंत्र असा समज होता. पण आज, तेच यंत्र अत्याधुनिक अग्नि नियंत्रण प्रणाली, ऑटोमॅटिक लोडिंग आणि मार्गदर्शित क्षमतेसह सज्ज झालं आहे. जगभरातील सामर्थ्यवान सैन्यदलांकडे अशा तोफांची भली मोठी तुकडी आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही.

2S35 Koalitsiya-SV

रशियाची 2S35 Koalitsiya-SV ही अशाच प्रगत तोफांपैकी एक आहे. 152 मिमीची ही स्वयं-चालित तोफ 70 किमीपर्यंत मारा करू शकते. तिची अचूकता आणि वेग हा युद्धात निर्णायक ठरू शकतो. तिला अत्याधुनिक डिजिटल फायर कंट्रोल सिस्टमचा आधार आहे.

Panzerhaubitze 2000

जर्मनीने तयार केलेली Panzerhaubitze 2000 देखील कमालीची आहे. 155 मिमीची ही L52 तोफा विशेषतः तिच्या प्रचंड फायर रेटसाठी ओळखली जाते. एक मिनिटात ती अनेक गोळ्या डागू शकते. तिची मर्यादा 40 किमी असून, ती NATO देशांमध्ये विशेष पसंतीस उतरते.

K9 Thunder

दक्षिण कोरियाची K9 Thunder ही तर सध्या जगातील सर्वाधिक मागणी असलेली हॉवित्झर तोफा आहे. तिचा वापर फक्त कोरियामध्येच नव्हे, तर पोलंड, तुर्की, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतही होतो. तिची अचूकता, स्थिरता आणि स्वयंचलन तंत्रज्ञान तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते.

CAESAR

फ्रान्सने तयार केलेली CAESAR तोफा वेगळीच धाटणीची आहे. ट्रकमाउंटेड असल्यामुळे ती अगदी कमी वेळात एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येते. रेंज 42 किमी असून, हलकी असल्यामुळे पर्वतीय किंवा अरुंद भागातही ती सहज वापरता येते.

PLZ-05

चीनची PLZ-05 ही अत्यंत घातक आणि स्वयंचलित हॉवित्झर आहे. 50 किमीच्या रेंजमध्ये शत्रूवर मारा करणारी ही तोफा GPS मार्गदर्शन वापरून टार्गेट करते. तिचा वेग आणि अचूकता हळूहळू पश्चिमी देशांच्या तोफांशी स्पर्धा करत आहे.

अमेरिकेची M777 हॉवित्झर तर युद्धक्षेत्रात अगदी परीक्षित आहे. 155 मिमीची ही तोफा अफगाणिस्तान व इराकमध्ये अनेक युद्धांत वापरण्यात आली आहे. तिची ताकद इतकी आहे की, लहान युनिट्स देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतात.

“धनुष” तोफा

आता बोलूया भारताबद्दल आपली “धनुष” तोफा ही बोफोर्सची भारतीय आवृत्ती आहे, पण ती केवळ प्रतिकृती नाही, तर त्यापेक्षा अधिक स्वयंचलित आणि परिष्कृत आहे. ही 155 मिमी 45-कॅलिबरची तोफा जबलपूरच्या गन कॅरेज फॅक्टरीत तयार झाली आहे. तिची 38 किमी मारा क्षमता आणि सातत्याने अनेक तास गोळीबार करण्याची क्षमता धनुषला एक विश्वासार्ह अस्त्र बनवते. विशेष म्हणजे, ती बॅरल ओव्हरहीट न होता कार्य करत राहते. आज भारताच्या शत्रूंना खडबडून जागं करण्यासाठी हीच तोफा सीमारेषेवर सज्ज असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!