महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे, राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंगा चरणी प्रार्थना!

Updated on -

संगमनेर-पंढरपूरचा पांडूरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधूभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे. ही संस्कृती मानवतेला साद घालणारी असून महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे. राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली आहे.

संगमनेर मधील चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात माजीमंत्री बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणीची आरती व पूजा करण्यात आली. याप्रसंगी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, माजी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक, नाना देशमुख, सुभाष ताजने, श्याम अभंग, नितीन अभंग, डॉ. निलेश सातपुते, बाबा मंडलिक, सौरभ कोल्हे, रामनाथ अभंग, गजेंद्र अभंग, मिलिंद औटी, प्रमिला अभंग, रवींद्र बडे, सुदर्शन पलोड, जीवन पांचारिया, आशिष कोठवळ, प्रशांत अभंग, दत्ता चव्हाण, सतीश बोरकर, राहुल चौधरी, आलोक बर्डे, विशाल ढोले, समीर भोर, मयूर राऊळ आदींसह संगमनेर मधील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. याप्रसंगी माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आषाढी एकादशीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्ती-भावाने साजरा केला जातो. पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. वारीमध्ये सर्व मतभेद विसरून एकत्र पायी चालत जातात. महिनाभर महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरीची वाट चालत असतात. कळसाचे दर्शन जरी झाले तरी हे सर्व वारकरी आनंद मानतात.

तर डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आनंद सोहळा आहे. लाखो वारकरी देवाच्या दर्शनाला जातात हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो.

संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहाने सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. हे भक्तीचे पर्व असून प्रार्थना उपवासाने परमेश्वरा जवळ जाता येते, असे सांगताना टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर हा सुखद क्षण प्रत्येकासाठी असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये टाळ-मृदुंगाच्या गजरात नागरिकांनी आषाढी एकादशी साजरी केली. याच प्रमाणे तालुक्यातील विविध विद्यालयांमधून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाने आषाढी वारीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!