घोटण- शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय, या ग्रामीण भागातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित ‘मेगा ओपन कॅम्पस ड्राईव्ह २०२५” मध्ये ४८९ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या आणि त्यामधून २४२ विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
या वेळी मानव संसाधन व्यवस्थापक श्री. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगार संधी, मुलाखतीची तयारी, आणि कौशल्य विकास यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परिणामाधिष्ठित शिक्षणपद्धती प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. ‘याचाच परिपाक म्हणजे आज विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे गौरवशाली यश आहे,’ असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ. एकनाथराव ढाकणे यांनी या वेळी व्यक्त केले.
या यशामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, विश्वस्त ऋषिकेश ढाकणे, सचिव सौ. जया रहाणे ढाकणे, प्राचार्य डॉ. अंबादास डोंगरे, प्राचार्य डॉ. रियाज खान आत्तार, डॉ. महेश मरकड, प्राचार्य श्री. संतोष आंधळे, डॉ. प्रवीण नागरगोजे, प्रा. सुनील अवताडे यांचे सहकार्य मोलाचे ठरले. कार्यक्रमासाठी प्रा. घुटे, प्रा. बोराळे, प्रा. मस्के, प्रा. घाडगे, प्रा. शिरसाठ, प्रा. बटुळे, प्रा. मोटाळे, प्रा. गुजर, प्रा. देशमुख तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांनी मेहनत घेतली.