अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात १४ हजार ९५३ विद्यार्थ्यांना देण्यात आली जातवैधता प्रमाणपत्रे

Published on -

अहिल्यानगर- सध्या विद्यार्थ्यांच्या अकरावी सायन्ससह विविध शाखांत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच सीईटी परीक्षा दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी जात पडताळणी समिती कार्यालयात गर्दी होत आहे. अहिल्यानगर येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे १ जानेवारी २०२५ पासून १७ हजार ४५१ प्रकरणे जात वैधता पडताळणीसाठी प्राप्त झाली होती. जिल्हा जात पडताळणी त्रिस्तरीय समितीने जूनअखेर सहा महिन्यांत जात वैधतेसाठी आलेली १४ हजार ९५३ प्रकरणे निकाली काढली आहेत.

अहिल्यानगर येथील जात पडताळणी समिती कार्यालयाकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी रेशमा माळी, समाजकल्याण उपायुक्त राकेश पाटील व संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांची त्रिस्तरीय समिती जातवैधता पडताळणीचे काम सुरू आहे. सध्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे निकाली लावण्याला समिती प्राधान्य देत आहे, असे सांगितले आहे. जात पडताळणी समितीने बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या – मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठीचा नवीन प्रकल्प सुरू केला आहे.

त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून, समान संधी केंद्राच्या माध्यमातून – विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच जमा करून घेण्याचे निर्देशही समितीने महाविद्यालयाला दिले होते. जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास कोणतीही अडचण येत नाही. सध्या जात पडताळणी समितीकडे सीईटीची प्रकरणे जास्त आलेली आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांनी सांगितले.

जात पडताळणीसाठी मानवी दिनांकाचे पुरावे महाराष्ट्राचा रहिवास असल्याचे पुराव्यामध्ये एससीसाठी सन १९५०, एनटीसाठी १९९१, तर एसबीसी आणि ओबीसी प्रवर्गासाठी १९६७ आहेत. जातवैधता पडताळणीसाठी हे पुरावे देणे आवश्यक आहे. हे पुरावे दिले, तर प्रकरण वेळेत पूर्ण होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळते. जात वैधता पडताळणीच्या शैक्षणिक प्रकरणासाठी शुल्क १०० रुपये, सेवाविषयक व निवडणूक कामासाठी ५०० रुपये शुल्क आहे. जातवैधता पडताळणीसाठी परिपूर्ण कागदपत्रे
जमा केल्यास विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्रे मिळते, असेही संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांनी सांगितले.

जून २०२५ मध्ये ३३९० जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रकरणे दाखल झाली होती. जून अखेरपर्यंत पडताळणी करून २०८५ प्रकरणे मंजूर करून जात वैधता प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित राहिलेल्यांना ऑनलाइन त्रुटी कळवण्यात आल्या आहेत. समितीच्या वतीने छाणनीचे काम चालू आहे.
त्रुटी पुर्तता व मान्यतेसाठी जातवैधतेची २५१५ प्रकरणे प्रलंबित

जिल्हा जात पडताळणी त्रिस्तरीय समितीकडे १ जानेवारी २०२५ पासून आजअखेर १७ हजार ४५१ प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल झाली होती. यापैकी १४ हजार ९५३ प्रकरणे समितीने निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्रे दिली आहेत. अद्याप त्रुटी पूर्तता व मान्यतेसाठी २५१६ प्रकरणे जातवैधता पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत, अशी माहिती संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांनी दिली.

ही कागदपत्रे जातवैधता प्रमाणपत्रसाठी आवश्यक

फार्म नंबर १५ ए ज्यावर प्राचार्यांची सही, उमेदवारांचे दोन शालेय निर्गम उतारे, यात प्राथमिक व माध्यमिक, वडिलांचे शालेय निर्गम / टी. सी. (असेल तर), उमेदवार जर ओबीसी असेल तर सन १९६७आतील पुरावा, (यात आजोबा, चुलता, वडील), व्हीजेएनटी असेल तर १९६३ च्या आतील पुरावा (यात आजोबा, चुलता, वडील), उमेदवार एससी असेल तर १९४९ आतील पुरावा (यात आजोबा, चुलता, वडील), जात प्रमाणपत्र मूळप्रत, कुटुंबातील एक व्यक्तीचे जातवैधता प्रमाणपत्र (असेल तर), अर्जदाराचे वडील निरक्षर असल्यास १०० रुपयांच्या बॉण्डवरील शपथपपत्र, या व्यतिरिक्त उमेदवार हा त्याच्या भाऊ, बहीण, वडील यांचे शालेय निर्गम, जात प्रमाणपत्र, जातवैधता जोडू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!