अहिल्यानगरच्या बाजार समितीत कांद्याच्या भावात पुन्हा घसरण, सोमवारच्या बाजारात प्रतिक्विंटल कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव?

Published on -

अहिल्यानगर- अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी २४ हजार २२० क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १४०० ते १८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात शंभर रुपयांनी घट झाल्याचे दिसून आले.

अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी ४४ हजार ३६ गावरान कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १४०० ते १८०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला १००० ते १४०० रुपये, तीन नंबर कांद्याला ५०० ते १००० रुपये, चार नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये बाजारभाव मिळाला.

दरमयान, कांद्याला कमीतकमी दर २०० रुपये, मध्यम ११५० रुपये तर जास्तीत जास्त भाव १८०० रुपये मिळाला. दरम्यान, बाजार समितीत ११० कांदा गोण्यांना अपवादात्मक उच्च प्रतिचा २१०० रुपये दर मिळाला. १७५ कांदा गोण्यांना उच्च प्रतिचा प्रतिक्विंटल १९०० रुपये दर मिळाल्याचे अहिल्यानगर बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात सोमवारी उन्हाळ गावरान कांद्याच्या ३८ हजार ८२० गोण्यांची आवक झाली होती. यावेळी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १६०० ते १७०० रुपये, दोन नंबर कांद्याला १४०० ते १५०० रुपये, तीन नंबर कांद्यांना १२०० ते १३०० रुपये, गोल्टा कांद्याला ८०० ते १००० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!