या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काहीतरी खास घडणार आहे. ओटीटीवरच्या प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे, कारण विविध प्रकारच्या कथा, पात्रं आणि भावना घेऊन एकापेक्षा एक चित्रपट आणि वेबसीरीज आपल्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे, आर. माधवन आणि फातिमा सना शेख यांचा बहुप्रतिक्षित ‘आप जैसा कोई’ हा चित्रपटही अखेर नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. रोमँटिक कॉमेडी, सस्पेन्स, अॅक्शन आणि काही हटके कथा पाहण्याची संधी आता घरबसल्या मिळणार आहे.
‘ट्रेनरेक: द रिअल प्रोजेक्ट एक्स’

सुरुवात होते ‘ट्रेनरेक: द रिअल प्रोजेक्ट एक्स’ या माहितीपटापासून. 8 जुलैपासून प्रदर्शित होणारी ही कथा एका किशोरवयीन मुलीच्या वाढदिवसाच्या निमंत्रणाभोवती फिरते. हे निमंत्रण इतकं व्हायरल होतं की त्याचे परिणाम सोशल मीडियाच्या प्रभावाबद्दल गंभीर विचार करायला लावतात. हे वास्तवाचं दर्शन घडवणारं डॉक्युमेंटरी तुमचं मन हेलावून जाईल.
‘मॅडमॅक्स: फ्युरी रोड’
त्याच दिवशी ‘मॅडमॅक्स: फ्युरी रोड’सुद्धा नेटफ्लिक्सवर येतो आहे. ज्यांना अॅक्शन आणि थरार पाहायला आवडतो, त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे. या सिनेमात मॅक्स आणि एक बंडखोर महिला काही कैद्यांना वाचवण्यासाठी ज्या अकल्पनीय परिस्थितींमधून जातात, त्यात साहसाचं अगदी वेगळंच रूप दिसून येतं.
‘अंडर अ डार्क सन’

9 जुलैला प्रेक्षकांना थोडं खोलवर जाण्याची संधी मिळणार आहे, कारण ‘अंडर अ डार्क सन’ ही कथा एका तरुण आईभोवती फिरते जिला एका माणसाचा खून केल्याचा आरोप स्वीकारावा लागतो. हा माणूस तिचा बॉस आहे आणि तिला नंतर कळतं की तोच तिचा जैविक वडील आहे. ही गुंतागुंतीची, भावनांनी भरलेली पण सस्पेन्सने भारलेली कथा आहे.
‘जियाम’
तसंच, झोम्बीप्रेमींसाठी 9 जुलैलाच ‘जियाम’ नावाचा थाई चित्रपट रिलीज होतो आहे. वेगवान लढती आणि धाडसी युवकाची ही गोष्ट थराराचा नवा अनुभव देईल.
‘ब्रिक’
10 जुलैला ‘ब्रिक’ नावाचा एक वेगळाच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या कथेत एक भिंत केंद्रस्थानी आहे, पण ही भिंत फक्त भिंत नाही. ती अनेक रहस्यं आणि कथा लपवून बसली आहे. जर तुम्हाला चित्रपटात काहीतरी हटके आणि ट्विस्टसह पाहायला आवडतं, तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे.
‘आप जैसा कोई’
या सगळ्यांच्या केंद्रस्थानी 11 जुलैला ‘आप जैसा कोई’ आहे. आर. माधवन आणि फातिमा सना शेख या दोघांची अनोखी जोडी या चित्रपटात दिसेल. जेव्हा एका स्पष्टवक्त्या, बिनधास्त मुलीचा आणि नीतीच्या मार्गावर चालणाऱ्या एका तरुणाचा मार्ग एकमेकांना धडकतो, तेव्हा त्या धडकेत प्रेम, संघर्ष, विनोद आणि आयुष्याचा गोडवा सगळं काही उमटतं.
‘ऑलमोस्ट कॉप्स’
याच दिवशी अजून एक धमाल विनोदी चित्रपट ‘ऑलमोस्ट कॉप्स’ देखील प्रदर्शित होतो आहे. यामध्ये कॉमेडी आणि अॅक्शनचा जबरदस्त तडका मिळणार आहे. जर तुम्हाला हलकाफुलका पण मनोरंजक कंटेंट पाहायचा असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे.