जिओ आणि एअरटेलचे 84 दिवसांचे दमदार प्लॅन! रोज 3GB डेटा, OTT अॅक्सेस आणि…; पाहा कुणाचा प्लॅन ठरतोय दमदार?

Published on -

जर तुम्ही 84 दिवसांची वैधता असलेला एक असा प्रीपेड प्लॅन शोधत असाल जो केवळ डेटा आणि कॉलिंगपुरता मर्यादित नसेल, तर जिओ आणि एअरटेल या दोन टेलिकॉम दिग्गजांनी तुमच्यासाठी काही भन्नाट पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. केवळ फोनवर इंटरनेट वापरणेच नव्हे, तर या प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर विनामूल्य अ‍ॅक्सेसही मिळणार आहे.

एअरटेलचे प्लॅन्स

एअरटेलकडून काही अत्यंत उपयुक्त आणि थोडक्याच पैशात जास्त फायद्याचे प्लॅन समोर आले आहेत. उदाहरणार्थ, 979 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह येतो. यामध्ये तुम्हाला 22 पेक्षा जास्त ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही मिळतो, ज्यामुळे मोबाईलवर मालिका, चित्रपट किंवा लाईव्ह शो पाहणे अधिक सुलभ होते.

जर तुम्ही थोडा जास्त खर्च करण्यास तयार असाल, तर 1,029 रुपयांचा प्लॅन तुम्हाला Hotstar चा 3 महिन्यांचा सबस्क्रिप्शनसह मिळतो. हेही 84 दिवसांसाठी असून दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 100 मोफत SMS देतो. हेच फायदे 1,199 रुपयांच्या प्लॅनमध्ये थोड्याशा अपग्रेडसह मिळतात , म्हणजे दररोज 2.5GB डेटा आणि Amazon Prime Lite चे मोफत सबस्क्रिप्शन.

जिओचे प्लॅन्स

दुसरीकडे, जिओनेही स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा 859 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 मोफत SMS आणि जिओ टीव्ही व जिओ हॉटस्टारचा अ‍ॅक्सेस देतो. हा प्लॅन त्याच्या किंमतीच्या मानाने खूपच फायदेशीर आहे.

949 रुपयांचा प्लॅनही जिओकडून आहे, ज्यामध्ये 2GB डेटा, कॉलिंग आणि ओटीटी फायदे मिळतात. मात्र ज्यांना अधिक डेटा हवा आहे, त्यांच्यासाठी 1,199 रुपयांचा प्लॅन सर्वोत्तम आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज तब्बल 3GB डेटा मिळतो, म्हणजे रोज काही तासांच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी आणि गेमिंगसाठी भरपूर डेटा, त्यात पुन्हा Hotstar आणि JioTVचा फ्री अ‍ॅक्सेसही आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!