पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश

Published on -

पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला असून या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्याखासदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांचे ते मोठे यश मानले जात आहे.

या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर ३८ किलोमीटरने कमी होईल. सध्या दौंड मार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे  या रेल्वेमार्गाची प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांच्या या मागणीची  दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी निवडणूकीनंतर लगेच संसदेमध्ये तसेच केंद्र सरकारकडे या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता.

अहवाालानुसार या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टीकोनातूनही तो फायदेशीर राहील असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतुद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे.

या रेल्वेमार्ग ११६ किलोमीटर लांबीचा असून नगर ते पुणेदरम्यान ११ स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून पुणे-वाघोली-शिक्रापुर, रांजणगांव, कारेगांव, शिरूर, सुपा, चास- केडगांव या मार्गाने हा रेल्वेमार्ग अहिल्यानगर रेल्वेस्थानकाशी जोडला जाणार आहे.

खा. लंके यांचा आग्रह 

या रेल्वेमार्गासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी अलिकडेच पुण्यात पार पडलेल्या पुणे व सोलापूर रेल्वे मंडळांतर्गत संसदीय रेल्वे समितीच्या महत्वपूर्ण बैठकीत या मार्गाला गती देण्याची मागणी केली होती. हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगत त्यासाठी आपण संसदेत तसेच केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्याचे नमुद केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!