महाराष्ट्रातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर, ‘ही’ आहेत राज्यातील टॉप 10 श्रीमंत व्यक्ती ! सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये किती मराठी ?

महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी समोर आली आहे. त्यानुसार आता आपण राज्यातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 व्यक्तींची माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे या यादीत किती मराठी भाषिक आहेत याचाही आढावा आज आपण घेणार आहोत.

Published on -

Maharashtra Richest Persons : नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘फोर्ब्स’ ने जगभरातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी पाहणार आहोत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात भाषावाद मोठ्या प्रमाणात उफाळून निघाला आहे. राज्यात मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांवरून मोठा वाद सुरू आहे.

हा वाद सुरू झाला तो राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर. खरे तर आता राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलेला आहे पण मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेवरून मोठा वाद भेटलेला आहे. जे लोक मराठी भाषेला विरोध करत आहे तसेच मराठी बोलण्यास नकार देत आहेत अशा लोकांना शिवसेना ठाकरे गटाकडून आणि मनसेकडून सक्ती केली जात आहे.

काही व्यापाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चांगला चोप सुद्धा देण्यात आला आहे. पण, मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांबाबत एक नवीन आणि अगदीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत पहिल्या दहा लोकांमध्ये एकाही मराठी माणसाचा समावेश नाहीये.

महाराष्ट्रातील सुरुवातीचे 10 श्रीमंत लोक महाराष्ट्रात राहतात परंतु ते मराठी भाषिक नाहीत. यामुळे ही यादी पाहून प्रत्येकच मराठी माणसाला एक मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 व्यक्तींची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

 महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत पहिले दहा व्यक्ती 

मंगल प्रभात लोढा : या यादीत मंगल प्रभात लोढा यांचा दहावा नंबर लागतो त्यांच्याकडे 441 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे. ते मुंबई येथील मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. पण ते मराठी भाषिक नाहीत.

पराग शाह : महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांमध्ये पराग शहा यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. पराग शहा यांचा या यादीत नववा नंबर आहे. ते मुंबईतील भाजपा आमदार आहेत. शहा यांच्याकडे 3315 कोटी रुपयांची जंगम आणि 67 कोटीची अचल संपत्ती आहे. पराग शहा हे एक बिल्डर आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शहा हे अमराठी आहेत. 

सत्यनारायण नुवाल : सत्यनारायण हे सोलर इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. ते महाराष्ट्रात राहतात पण मराठी भाषिक नाहीत. सत्यनारायण यांच्याकडे 4.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे आणि ते या यादीत आठव्या क्रमांकावर येतात.

राधाकिशन दमानी : डी मार्ट चे संस्थापक राधाकिशन दमानी हे मुंबईत राहतात मात्र ते अमराठी आहेत. दमानिया यांच्याकडे 15.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदारांच्या यादीत सातव्या नंबरवर आहेत. 

कुशल पाल सिंग : कुशल पाल सिंग यांच्याकडे 18.1 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये कुशल पाल सिंग यांचा आठवा नंबर लागतो. पण महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत ते सहाव्या स्थानी येतात. डीएलएफ या देशातील नामांकित रिअल इस्टेट कंपनीचे ते अध्यक्ष आहेत.

कुमार बिर्ला : कुमार बिर्ला हे महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 व्यक्तींमध्ये पाचव्या नंबरवर येतात. बिर्ला यांच्याकडे 21.2 अब्ज डॉलर रुपयांची संपत्ती आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत.

सायरस पूनावाला : पूनावाला हे सुद्धा अमराठी आहेत, मात्र ते पुण्यात राहतात आणि ते महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. त्यांच्याकडे 21.5 अब्ज डॉलर ची संपत्ती आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते संस्थापक आहेत.

दिलीप सांगवी : महाराष्ट्रातील टॉप दहा लोकांमध्ये सांगवी यांचा सुद्धा नंबर लागतो. ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांच्याकडे 29.9 अब्ज डॉलर ची संपत्ती आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या फार्मा कंपनीचे ते संस्थापक आहेत. 

गौतम अदानी : महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी यांचा दुसरा नंबर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीतही दुसऱ्या स्थानी येतात. त्यांच्याकडे एकूण 63.3 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ते अदानी ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

मुकेश अंबानी : महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा पहिला नंबर लागतो. ते फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ते मुंबईत राहतात मात्र अमराठी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 94.1 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!