अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची १७०६ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४६५ क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला १५०० ते २४०० रुपये भाव मिळाला. यावेळी टोमॅटोची ४०५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. वांग्याची २० क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ५००० ते ८००० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत पालेभाजांच्या २४९०५ जुड्यांची आवक झाली होती.
अहिल्यानगर बाजार समितीत मंगळवारी काकडीची १२० क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. गवारीची ७ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ३००० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ३१ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला २४००८ ते ४५०० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची ४ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल २००० ते ७००० रुपये भाव मिळाला.

दोडक्याची १९ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. कारल्याची १६ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल २००० ते ५५०० रुपये भाव मिळाला. कैरीची ३ क्विंटलवर आवक झाली होती. कैरीला २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ४७ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल १५०० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. रताळ्याची १०० क्विंटल आवक झाली होती.
रताळ्याला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये भाव मिळाला. कोबीची ७८ क्विंटल आवक झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. वालाची १ क्विंटल आवक झाली होती. वालाला ८००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची दोन क्विंटलवर आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल ६ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.