घरबसल्या फक्त 2 मिनिटांत कळणार ₹2000 खात्यावर आलेत की नाही?, ‘अशी’ चेक करा PM किसानची लाभार्थी यादी!

Published on -

तुमच्या बँक खात्यात 2,000 रुपये येणार आहेत का, हे आता घरबसल्या अवघ्या दोन मिनिटांत सहज कळू शकतं. सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही, याची खात्री करायची असेल, तर आता कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.तुम्ही घरबसल्या मोबाइलवर यादी तपासू शकता.

पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर प्रत्येक हप्त्याची माहिती वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. कारण कधी कधी, काही तांत्रिक त्रुटींमुळे किंवा कागदपत्रांमधील विसंगतीमुळे हप्ता थांबू शकतो आणि त्याची दुरुस्ती वेळेत केली नाही, तर पुढचे पैसेही अडकू शकतात.

यादीत नाव कसं तपासणार?

आता महत्त्वाचा प्रश्न असा की, तुमचं नाव यादीत आहे की नाही, हे कसं शोधायचं? त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. तिथे ‘लाभार्थी यादी’ हा पर्याय निवडायचा आणि नंतर तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव यासारखी माहिती भरायची. या माहितीच्या आधारे, तुमच्या गावातील सगळी यादी समोर येईल आणि त्यात तुमचं नाव, वडिलांचे नाव, आणि योजनेचा दर्जा दिसेल. जर तुमचं नाव तिथे नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला ते पुन्हा दुरुस्त करता येतं.

हप्त्याची सध्याची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर ‘Beneficiary Status’ या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा पीएम किसान रजिस्ट्रेशन क्रमांक द्यावा लागतो. त्यानंतर मिळालेल्या OTP च्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता की तुमचे किती हप्ते जमा झाले आहेत, कोणत्या तारखेला झाले आहेत, आणि कोणत्या बँकेत जमा झाले आहेत. या माहितीमध्ये आधार पडताळणी, बँक तपशील आणि इतर गोष्टींचीही स्थिती स्पष्टपणे दिसते.

ऑनलाइन सुधारणा कशी कराल?

कधी कधी असे होते की, तुम्ही फॉर्म भरलेला असतो, पण त्यात एखादं कागदपत्र चुकलेलं असतं किंवा आधार आणि बँक खातं लिंक नसल्यानं तुमचं नाव यादीत येत नाही. अशा वेळी ‘Edit Aadhaar Failure Record’ किंवा ‘Update Self Registered Farmer’ या पर्यायांचा वापर करून तुम्ही ऑनलाइन सुधारणा करू शकता. आवश्यक ते कागद सुधारून पुन्हा सबमिट करता येतात.

तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल, तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन मदत मिळवू शकता. बरोबर आधार कार्ड, बँक पासबुक आणि जमीन संबंधित कागदपत्रं घ्यायला विसरू नका. शिवाय, मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800-115-526 वरही कॉल करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!